आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा मला कॅन्सरविषयी कळाले तेव्हा मी हसत होते, पण जेव्हा डॉक्टरने सांगितले की, \'तुमचे ब्रेस्ट काढावे लागेल तेव्हा मी खूप कोलमडून गेले आणि कित्तेक तास रडत होते\'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी कॅन्सर सारख्या घातक आजाराला मात दिली आहे. यामध्ये सोनाली बेंद्रे, मनीषा कोयराला आणि मुमताज यांच्यासारख्या अभिनेत्रीचा समावेश आहे. अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपनेदेखील कॅन्सरची लढाई जिंकी आहे. ताहिरा अनेकदा आपल्या आजाराशी निगडित माहिती सोशल मीडियावर शेयर करते. अशातच एका इंटरव्यूमध्ये ताहिराने कॅन्सरबद्दल अनेक गोष्टी शेयर केल्या. ताहिरानुसार, जेव्हा डॉक्टरने तिला सांगितले की, तुझे ब्रेस्ट काढावे लागेल तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. सप्टेंबर, 2018 मध्ये ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. 

इंटरव्यूमध्ये ताहिराने सांगितले, ''जेव्हा मला कॅन्सरविषयी कळाले तेव्हा मी हसत होते. मला हसताना पाहून आयुष्मान हैरान होता. जर हा आजार मला  तीन-चार वर्षांपूर्वी झाला असता तर कदाचित मी इतकी हिम्मत दाखवू शकले नसते आणि सगळ्या वाईट विचारांनी मला घेरले असते. पण आता मी माझ्या कणखरपणाचे कारण बुद्धिज्मला मानते. मी याला फॉलोदेखील करते."

ताहिरानुसार, ''एक वेळ अशीही होती, जेव्हा मी रडू लागले होते. झाले असे की, डॉक्टरने सांगितले कि माझे ब्रेस्ट काढावे लागेल. ज्याला ते माझ्या पाठीच्या टिश्यूजने परत कंस्ट्रक्ट करतील. हे ऐकूनच मला खूप रडू आलेआणि मी खूपवेळा रडत राहिले. अशा कठीण काळात माझ्या पतीने मला सांभाळले आणि म्हणाला - तू पागल आहेस का ? जेव्हा कँसरबद्दल कळाले होते तेव्हा तू रडत होती आणि जेव्हा आता त्याला बाहेर काढत आहेत तर तू रडते आहेस. जेव्हा आयुष्मानने मला हिम्मत दिली तेव्हा मलाही वाटले की, खरंच यामध्ये रडायचे कशाला.'' ताहिराने पुढे सांगितले, 'अशा काळात आपल्याला आपल्या फॅमिलीच्या सपोर्टची सर्वात जास्त गरज आहे.'

आजाराबद्दल कळल्यानंतरही काम करत होती ताहिरा...
कँसरबद्दल कळाल्यानांतरही ताहिराने आपले काम सोडले नाही आणि सर्व गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या. ताहिरानुसार, ‘कँसर सारख्या आजाराचे नाव ऐकताच बायका जॉब काय तर जगणेही सोडून देतात. पण मला आजाराबद्दल कळाल्यानांतरही मी माझे काम सोडले नाही. महिलांनी कधी असा विचार नाही केला पाहिजे की, हे झाले तर आयुष्य संपले.''

कॅन्सरचे सर्व डाग माझ्यासाठी सन्मानाची चिन्हे...
वर्ल्ड कॅन्सर डे (4 फेब्रुवारी) ला ताहिराने सोशल मीडियावर आपला एक फोटो टाकून पोस्ट शेयर केली होती. फोटोमध्ये ताहिरा बाल्ड लुकमध्ये होती. तिने आपल्या बॉडीच्या बॅक साइडचा फोटो शेयर केला, ज्यावर सर्जरीच्या खुणा दिसत आहेत. ताहिराने पुढे लिहिले, ''अशा करते की, तुम्ही हा दिवस असा सेलिब्रेट करावा, ज्याने कँसरविषयी लोकांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा संपतील. मी वास्तवात आपल्या सर्व डागांना आलिंगन देते कारण ती माझ्या सन्मानाची चिन्हे आहेत. आयुष्यात बऱ्याचवेळा असे होते की, आपण मागे चालल्या जातो, पण गरज याची आहे की, आपण एक पाऊल कमीत कमी अर्धे पाऊल तरी पुढे टाकावे. ताहिराने पुढे लिहिले, हा फोटो मी तुमच्यासोबत यासाठी शेअर केला जेणेकरून मी तुमच्यासोबत माझ्या या आजाराबद्दल काही बोलू शकावे.''

11 वर्षे डेटिंगनंतर आयुष्मान-ताहिराने केले लग्न...
आयुष्मान त्याच्यापेक्षा दीड वर्षांनी मोठी असलेली पत्नी ताहिरा कश्यपचा फॅन आहे. दोघे कोचिंगदरम्यान भेटले. त्यावेळी आयुष्मान 16 वर्षांचा होता. पहिल्या नजरेतच दोघांचेही एकमेक्नावर प्रेम बसले. ताहिराला आयुष्मान आपली पहिली आणि शेवटची गर्लफ्रेंड मानतो. दोघांचे प्रोफेशन एकमेकांपासून खूप वेगळे आहेत. त्यामुळे त्यांच्या युष्यात कधीच कोणती समस्या अली नाही. आयुष्मान याचे क्रेडिट आपल्या पत्नीलाच देतो. तो म्हणतो, ताहिरा त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त समजूतदार आहे. 11 वर्षांच्या रिलेशननंतर 2011 दोघांनी लग्न केले. ताहिरा आता मुंबईमध्ये आयुष्मानसोबत राहते. ती एक लेखिका आणि कॉलेज लेक्चरर आहे. दोघांची दोन मुले मुलगा विराजवीर आणि मुलगी वरुष्का आहे.

बातम्या आणखी आहेत...