आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayushman Reached The Podcast Show And Said : 'The Transformation That I Did Notice In Tahira During Cancer Was A Miracle'

पॉडकास्ट शोमध्ये पोहोचलेला आयुष्मान म्हणाला - 'कॅन्सरदरम्यान ताहिरामध्ये जे ट्रांसफॉर्मेशन मी पहिले, ते चमत्कारिक होते'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कॅन्सरसारख्या घातक आजारालाही मात दिली आहे. यामध्ये सोनाली बेंद्रे, मनीषा कोयराला आणि मुमताज या अभिनेत्री सामील आहेत. अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यपदेखील कॅन्सरशी लढाई जिंकली आहे. ताहिरा नेहमी आपल्या आजाराशी निगडित महत्वाच्या गोष्टी सोशल मीडियावर शेअर करायची. सप्टेंबर, 2018 मध्ये ताहिराला ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला होता. यानंतर तिने उपचार घेतले आणि ती ठीक झाली. ताहिराच्या कॅन्सर जर्नीमध्ये तिचा पती आयुष्मान खुरानाने तिला भरपूर साथ दिली. अशातच जेव्हा ताहिराच्या पॉडकास्ट शो माय एक्स-ब्रेस्टमध्ये पोहोचली तेव्हा तिने अनेक गोष्टी शेअर केल्या. 

आयुष्मानने केले ताहिराचे कौतुक... 

आयुष्मान ताहिराला म्हणाला, आम्ही या लढाईमध्ये सोबत होतो, पण तू माझी प्रेरणा बनली आहेस, मी पहिले तू पूर्वीपेक्षा जास्त कणखर झाली आहेस आणि हे ट्रान्सफॉर्मेशन एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. हे ट्रांसफॉर्मेशन योग्य वेळी आले आणि तुला ताकद दिली की, तू प्रत्येक आव्हानाचा सामना उत्तम पद्धतीने करू शकशील आणि आता बघ तू एखाद्या जिंकलेल्या राणीप्रमाणे माझ्यासमोर उभी आहेस. तू ज्या पद्धतीने कॅन्सरशी लढाई लढली आहेस, तू माझ्यासाठी आणि दोन्ही मुले विराजवीर आणि वरुश्का यांच्यासाठीही प्रेरणा बनली आहेस.  

बातम्या आणखी आहेत...