Home | News | Ayushmann khurana will be teaming up with actors Gajraj Rao and Neena Gupta for the upcoming film

आयुष्मान खुराणा आगामी चित्रपटात साकारणार 'गे'ची भूमिका; पुन्हा एकदा दिसणार नीना गुप्ता, गजराज राव आणि आयुष्मान हे त्रिकुट

दिव्य मराठी वेब, | Update - Jul 16, 2019, 12:48 PM IST

अशा विषयासाठी नीना आणि गजराज यांनाच होती पहिली पसंती, आनंद एल राय करणार चित्रपटाचे दिग्दर्शन

 • Ayushmann khurana will be teaming up with actors Gajraj Rao and Neena Gupta for the upcoming film

  बॉलीवूड डेस्क - आयुष्मान खुराणा पुन्हा एकदा 'बधाई हो' फेम जोडी नीना गुप्ता आणि गजराज राव यांच्यासोबत काम करताना दिसणार आहेत. हे त्रिकुट 'शुभ मंगल सावधान' चित्रपटाचा सीक्वल 'शुभ मंगल ज्यादा सावधान' मध्ये दिसणार आहे.

  नीना आणि गजराज यांनाच होती पहिली पसंती
  आनंद एल राय चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. हे त्रिकुट पुन्हा एकदा सोबत काम करणार असल्याची त्यांनी पुष्टी केली. आनंद म्हणाले की, 'शुभ मंगल ज्यादा सावधान' गे रिलेशन्सवर आधारित आहे. अशात अशाप्रकारच्या विषयासाठी नीना आणि गजराज यांच्यासारख्या कलाकरांचा शोध सुरु होता. या दोघांनी चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिल्यामुळे मी आनंदी आहे.

  गे बनणार आयुष्मान खुराणा
  'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपटात आयुष्मान एका गे ची भूमिका पार पाडताना दिसणार आहे. आयुष्मानच्या अपोझिट राजकुमार रावला घेण्याबाबत चर्चा सुरु होत्या. पण नंतर आनंद यांनी याचे खंडन केले आहे. आयुष्मानने आतापर्यंत बरेच हिट चित्रपट दिले आहेत. अंधाधुन, बधाई हो, बरेली की बर्फी आणि अलिकडेच प्रदर्शित झालेला आर्टिकल 15 या चित्रपटांचा समावेश आहे. आता या नवीन चित्रपटापासून प्रेक्षकांना अपेक्षा आहेत.

 • Ayushmann khurana will be teaming up with actors Gajraj Rao and Neena Gupta for the upcoming film
 • Ayushmann khurana will be teaming up with actors Gajraj Rao and Neena Gupta for the upcoming film

Trending