आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क: 'तुम्हारी सुलू' आणि 'चीट इंडिया'सारख्या चित्रपटांची निर्मिती केल्यानंतर टी सिरीज आणि इलिप्सिस एंटरटेनमेंट लवकरच आपल्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहेत. या नाव न ठरलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा कश्यप खुराना करणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण पुढच्या वर्षी मुंबईत सुरू होईल. लवकरच चित्रपटाच्या कलाकारांची घोषणा करण्यात येईल. यापूर्वी ताहिराने एक माहितीपट 'टॉफी'देखील बनवला होता. त्याची निर्मिती आयुष्मानने केली होती.
बालपणीच्या मित्रासोबत थाटले लग्न
आयुष्मानची पत्नी ताहिरा कश्यप त्याची बालपणीची मैत्रीण आहे. ताहिरा 16 वर्षांची असताना आयुष्मान आणि तिची पहिली भेट झाली होती. दोन्ही कुटुंब एकमेकांच्या परिचयाचे होते. जवळजवळ 12 वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी 2011 मध्ये लग्न केले. ताहिरा आयुष्मानसाठी लकी ठरली. लग्नानंतर बॉलिवूडमध्ये त्याच्या यशस्वी करिअरला सुरुवात झाली. या कपलला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.