आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदर्श करवा चौथ! Cancer पीडित पत्नी ताहिरासाठी आयुषमानने ठेवला करवाचौथचा व्रत; तिच्या दीर्घायुष्याच्या कामनेसह हातावर लावली मेंदी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - आयुष्मान खुरानाने आपल्या पत्नीच्या दीर्घायुषासाठी स्वतः करवाचौथचा व्रत ठेवला आहे. त्याने इंस्टाग्रामवर आपली फोटो स्टोरी करताना लिहिले, ती या वर्षी करवाचौथचा व्रत नाही ठेवू शकत. पण, मी पाळणार आहे. तिच्या चांगल्या आरोग्यासाठी आणि दीर्घ आयुष्यासाठी... उल्लेखनीय बाब म्हणजे, ताहिराला स्तनाचा कर्करोग झाला आहे. तिच्या ब्रेस्टमध्ये कॅन्सर सेल्स वाढत होते. शस्त्रक्रियेनंतर ताहिराला आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यामुळेच ती उपवास किंवा व्रत ठेवू शकत नाही. 

 
14 सप्टेंबरला आयुष्मान खुरानाचा वाढदिवस होता. त्याच दिवशी वाइफ ताहिरा कश्यपला ब्रेस्ट कॅन्सर असल्याचे निष्पन्न झाले. आयुष्मान आणि ताहिराने या परिस्थितीत रडणे सोडून एकमेकांना खुश ठेवण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी त्यांना कर्करोगाचा खुलासा झाला. त्या दिवशी ते रडत बसले नाही. तर उलट अनुराग कश्यपचा चित्रपट मनर्जिया पाहण्यासाठी सिनेमागृहात गेले. ही गोष्टी तिने एका मुलीखतीमध्ये सांगितली होती. 

 
ताहिराने लिहिली होती भावनिक पोस्ट
> ताहिराने आपल्या इमोशनल पोस्टमध्ये लिहिले होते, की "किम कर्दाशियनला टक्कर देण्याची एक चांगली संधी मी आज गमावली आहे. हे छायाचित्र काही लोकांसाठी त्रासदायक ठरू शकते. मला झीरो स्टेजचा कॅन्सर डिटेक्ट झाला होता. कॅन्सर सेल्स झपाट्याने वाढत होते. त्यामुळे एक स्तन काढावा लागला. तरीही मी गर्वाने सांगू इच्छिते की मी आता एंजेलिना जोलीची अर्धी इंडियन आवृत्ती झाले आहे." उल्लेखनीय बाब म्हणजे, हॉलिवूड अभिनेत्री एंजेलिना जोली हिला स्तनांच्या कर्करोगामुळे दोन्ही स्तन काढावे लागले. 
> ताहिरा पुढे लिहिते, की "मस्करी बाजूला ठेवून पाहिल्यास, कर्करोगाने मला जगण्याची नवीन परिभाषा शिकवली आहे. आयुष्यातील अनिश्चिततेवर विश्वास ठेवा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. आपल्याच आयुष्यातील हिरो व्हा. आयुष्यात असे काहीच नाही, जे माणूस करू शकत नाही. मला वाटते, की कुठल्याही वयाच्या महिलेने नेहमीच सतर्क राहावे. माझे वय 35 वर्षे आहे. कुठल्याही स्वरुपाची लक्षणे दिसून आल्यास वेळीच डॉक्टरचा सल्ला घ्या. स्तनांविषयी आपण नेहमीच चिंतीत राहतो. परंतु, एक स्तन काढल्यानंतर माझे स्वतःवरील प्रेम आणखी वाढले आहे. ही पोस्ट स्वतःमध्ये लपलेल्या फायटरला समर्पित आहे."

 

बातम्या आणखी आहेत...