आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ayushmann Khurrana Shared His Thoughts About His Career, Says As An Artist He Is So Critical

आयुष्मान म्हणाला - मी स्वतः एक टीकाकार आहे, मला जे सांगायचे आहे ते चित्रपटांद्वारे सांगतोे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः मागील वर्ष हे आयुष्मान खुराणाच्या नावी राहिले. त्याने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ('अंधाधुन' चित्रपटासाठी) राष्ट्रीय पुरस्कार जिंकला आणि अनेक हिट चित्रपट आपल्या नावी केले. दैनिक भास्करसाठी अमित कर्ण यांच्याशी झालेल्या या बातचितमध्ये आयुष्मानने आपल्या चित्रपटांच्या पुढील उद्देशांबद्दल सांगितले.

  • एक कलाकार म्हणून तू स्वत: ला कसे पाहतो?

एक कलाकार म्हणून मी स्वतः एक टीकाकार आहे. मला जे सांगायचे आहे ते मी माझ्या चित्रपटांमधून जाहिर करतो. मी 'आर्टिकल 15' केला ​​आणि त्यातून माझी भूमिका स्पष्ट केली. दुसरा कुणी अभिनेता असता तर त्याने हा चित्रपट केला नसता. कोणताही व्यावसायिक अभिनेत्याने हा चित्रपट केला नसता कारण तो डार्क थ्रिलर होता. माझ्या चित्रपटांमधून मी समाजात बदल आणू इच्छितो. पुढे, मला काय म्हणायचे आहे ते फक्त माझे चित्रपट बोलतील.

  • गेल्या दोन-तीन वर्षांत तुझे सर्व चित्रपट यशस्वी झाले. लोक तुझे चित्रपट एवढे का पसंत करतात?

मला वाटते की, यात एक संबंधित घटक आहे. मी प्रेक्षकांच्या जगातील जवळचे पात्र साकारतो. यामध्ये अशा कथा किंवा थीम आहेत ज्यावर यापूर्वी काम केले गेले नाही. ते चित्रपट ज्या सेटअपमध्ये बनविलेले आहेत ते माझ्या कॅरेक्टरसाठी एम्बेरेसिंग आहेत, परंतु त्यांना प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. ही अतिशय अनोखी परिस्थिती आहे. साध्या शब्दांत सांगायचे तर, चित्रपट अद्वितीय असल्यास प्रेक्षक आपोआप माझ्या चित्रपटांशी जोडले जातात.

  • तुला पुढे काय करायचे आहे?

आतापर्यंत मी अॅक्शन चित्रपट केलेले नाहीत, म्हणून मला अॅक्शन करायची इच्छा आहे.

  • कसे अॅक्शनपट? टॉम क्रूझ करतो तसे?

नाही. मला सबजेक्ट बेस्ड चित्रपट करायचा आहे. असे काही ज्या विषयावर यापूर्वी कधीही चित्रपट आले नाहीत. समथिंग आउट ऑफ बॉक्स.

  • कोणत्या अभिनेत्यासोबत काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरला?

सध्या, 'गुलाबो सीताबो'मध्ये बच्चन साहेबांसोबत एक अतिशय संस्मरणीय घटना घडली आहे. कारण लहानपणापासूनच माझा एकच उद्देश होता. माझ्या बकेटलिस्टमध्ये बच्चन साहेबांसोबत काम करणे समाविष्ट होते. या चित्रपटात माझे ते स्वप्न पूर्ण झाले. या व्यतिरिक्त 'विक्की डोनर'नंतर शुजित दा आणि जुही चतुर्वेदी  या कॉम्बिनेशनसोबत पुन्हा एकत्र येणे हीदेखील एक मोठी गोष्ट आहे. 'विक्की डोनर'नंतर 'ड्रीम गर्ल'मध्ये पुन्हा अनू कपूर साहेबांसोबत काम करणे एक अद्भुत अनुभव होता. अनुजींसोबतचा माझा अनुभव खूप संस्मरणीय आहे.

  • तू खूप वाचन करतोस. असा एखादा विषय ज्यावर भविष्यात चित्रपट बनवू इच्छितो ?

होय, खरं म्हणजे मी पुस्तके खूप वाचत असतो. मला बर्‍याच कथा देखील आवडतात, पण कोणत्या कथेवर मला एखादा चित्रपट बनवायचा आहे, ते मी सांगणार नाही. कारण एकदा मी ती व्यक्त केली होती आणि त्यावर दुसर्‍याच व्यक्तीने चित्रपट बनविला होता. म्हणून मी आता ठरवले आहे की आतापासून मी शांतपणे स्क्रिप्ट लिहीन, चित्रपट तयार करीन आणि रिलीज करीन.

बातम्या आणखी आहेत...