आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कीमोथेरेपी घेत घेत चित्रपटाच्या प्री-प्रोडक्‍शनचे कामही करत आहे आयुष्मान खुरानाची पत्नी ताहिरा, लेखिका आणि कॉलेज लेक्चररसुद्धा आहे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड मध्ये हे वर्ष कँसर आणि इतर बिमाऱ्यांचा सामना करणाऱ्या लोकांच्याही नावे राहिले. सोनाली बेंद्रे, इरफान, ऋषि कपूर आणि ताहिरा कश्‍यप ही त्यांची नावे. सर्वांनी या कटू सत्याला स्वीकार केले आणि आणि त्याचा सामना केला. कुणीही आपल्या या पर्सनल प्रोब्लेममुळे इतर कुणाचे प्रोफेशनल नुकसान होऊ दिले नाही. ऋषि कपूरला जो चित्रपट मध्येच सोडावा लागला होता. त्या चित्रपटाची फीस त्यांनी परत देण्याचा प्रस्‍ताव दिला होता. मेकर्सने मात्र तो एक्‍सेप्‍ट केला नाही. ते चिंटू जी स्वस्थ होण्याची वाट पाहत आहेत. इरफानची हालत आता चांगली होत आहे. तो पेंडिंग आणि नवीन दोन्ही प्रोजेक्ट्स हातात घेत आहे. 

 

ताहिरा कामासोबतच करून घेत आहे कीमोथेरपी..  
ताहिरा कश्‍यप नवीन वर्षात आपल्या चित्रपटाचे डायरेक्शन सुरु करणार आहे. चित्रपटाचे शूटिंग ठरवलेल्या वेल्लेतच व्हावे, यासाठी ताहिरा कामाच्याबाबतीत कोणतीच कसूर सोडत नाही. त्यांच्या आप्तांनी सांगितले की, ती कीमोथेरेपीहि करवून घेत आहे आणि सोबतच चित्रपटाच्या प्री-प्रोडक्‍शन कामही करत आहे. या थेरेपीजमुळे शरीर आणि मन दोन्हींवर खूप परिणाम होतो. माणसाला एनर्जेटिक राहणे शक्य होत नाही. ताहिरा स्वतःसोबत असे होऊ देत नाही. ती कीमो केल्यानंतर प्री-प्रोडक्‍शन वर्क तर करतेच आहे. सोबतच आठवड्यातून दोन-तीन लेक्‍चरही घेत आहे. आत्तापर्यंत तिचे 8 कीमो झाले आहेत, 4 अजून बाकी आहेत.    

 

याचवर्षी सप्टेंबरमध्ये ताहिराने सोशल मीडियावर एक फोटो शेयर करून लिहिले होते, "माझा हा फोटो कुणाला विचलितही करू शकतो. माझ्या डाव्या ब्रेस्टमध्ये घातक पेशींसोबतच DCIS (ductal carcinoma in situ) असल्याचे कळले आहे. सरळ सरळ सांगायचे तर मला स्टेज 0 कँसर झाला आहे. कॅन्सरच्या पेशी वाढत आहेत. परिणामी मीही एंजलिना जॉलीसारखी हाफ इंडियन वर्जन बनले आहे. आता माझ्या बॅक टिशूचा काही भाग माझ्या ब्रेस्टमध्ये आहे. यामुळे माझ्या आयुष्याला नवे ओळख मिळाली आहे. जीवनाच्या अनिश्चिततेचा सम्मान करा आणि आपल्या आयुष्यातील ड्रामाचा हीरो बनण्याची हिम्मत आणि विश्वास ठेवा". 

बातम्या आणखी आहेत...