आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लागोपाट सात हिट चित्रपट दिल्यानंतर वाढली आयुष्मानची ब्रॅण्ड व्हॅल्यू, फिस 1 कोटीहून केली 2.5 कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता आयुष्मान खुराणाने यावर्षी लागोपाठ सात हिट चित्रपट ('बरेली की बर्फी', 'शुभ मंगल सावधान', 'अंधाधुन', 'बधाई हो', 'आर्टिकल 15', 'ड्रीम गर्ल' आणि 'बाला')  दिले आहेत. त्यामुळे बॉलिवूडमध्येच नव्हे तर जाहिरात जगतातही तो एक विश्वसनीय स्टार बनला आहे. वर्षाच्या सुरुवातीला त्याच्याकडे फक्त पाच जाहिराती होत्या. मात्र आता या वर्षअखेर त्याच्याकडे 20 जाहिराती आल्याचे दिसून आले आहे. या जाहिरातीतून तो वर्षाच्या सुरुवातीला 90 लाख ते 1 कोटी रुपये कमावत होता, आता तो वर्षाकाठी अडीच कोटी रुपये कमवत आहे. त्यामुळे आयुष्मानच्या जाहिरातीमध्ये थेट 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. रिअल इस्टेटपासून मोबाइल, कपडे, डियोड्रेंट आणि घड्याळाच्या नामांकित ब्रॅण्ड्सने त्याच्यासोबत हातमिळवणी केली आहे. त्यांचा तो आवडता स्टार झाला आहे.

  • या कंपन्यासोबत अशा प्रकारे जोडला आहे आयुष्मान
कंपनीरोलकधी जुळला
द मॅन कंपनीइन्व्हेस्टर आणि ब्रँड एम्बेसेडरमार्च
टायटन आय प्लसब्रँड एम्बेसेडरमार्च
एचडीएफसी पेेजॅपफीचर्ड सेलिब्रिटीमार्च
गोदरेज सिक्युरिटीसॉल्युशन ब्रँड एम्बेसेडरमार्च
रिअल मीब्रँड एम्बेसेडरमार्च
मॅजिक ब्रिक्सब्रँड एम्बेसेडर(कृती सेननसोबत)मार्च
नेक्सस मॉल हॅप्पीनेसएम्बेसेडरमार्च
डेनियल वेलिंग्टनब्रँड एम्बेसेडरमार्च
विंगाजॉय मार्चब्रँड एम्बेसेडरमार्च
अर्बन क्लॅपब्रँड एम्बेसेडरफेब्रुवारी-मार्च

  • नेहमी चर्चेत असतो

ट्रेड पंडित सांगतात की, 'आयुष्मानचे नाव यश, विश्वासार्हता, सापेक्षता आणि सत्यतेचे प्रतिशब्द बनले आहे. कोणत्याही ब्रँडशी कनेक्ट होण्याच्या दृष्टीने ही मोठी इक्विटी आहे. यामागील प्रमुख कारण म्हणजे त्याचे सातत्याने चित्रपट हिट होत आहेत. शिवाय तो नेहमी चर्चेत असतो, दुसरे म्हणजे तो लोकांना आवडू लागला आहे.

  • सोशल मीडियावर लोकप्रिय

तज्ञ सांगतात की, आयुष्मानचे आतापर्यंतचे आलेले चित्रपट वेगळ्या धाटणीचे होते. त्यामुळे तो सामान्य माणसांचा चेहरा म्हणून समोर येत आहे. वेगळ्या प्रकारचे चित्रपट निवडणे त्याच्यासाठी फायद्याचे ठरले आहे. कारण त्याला मुख्य प्रवाहाचा नायक समजले जाते. शिवाय आयुष्मान सोशल मीडियावरदेखील प्रचंड लोकप्रिय आहे म्हणून अनेक ब्रँडने त्याची निवड केली.