आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : जेव्हा सिल्व्हर स्क्रीनवर विविध आणि रंजक कथांची गोष्ट येते तेव्हा मेकर्सच्या डोक्यात आयुष्मान खुरानाचेच नाव येते. आयुष्मानने ना केवळ मनोरंजक भूमिका साकारल्या, तर तो त्या कथांचा चेहराही झाला आहे, ज्यांनी सामाजिकदृष्ट्या लोकांवर खूप खोलवर परिणाम केला आहे. 'आर्टिकल 15' सारख्या चित्रपटात जातीच्या नावावर होणाऱ्या अत्याचारांवर आधारित होता. 'शुभ मंगल ज्यादा सावधान' मध्ये समलैंगिकता स्वीकारण्याबद्दल बोलले गेले आहे. तो मुद्दाही आयुष्यमान मेनस्ट्रीममध्ये आणत आहे. त्यामुळे त्याने स्पेशल फोटोशूट केले.
आयुष्मानने आपला हा थॉट मुख्यत्वे सादर करण्यासाठी एक खास फोटोशूट केले आहे. एका हातात भारतीय ध्वज तिरंगा तर दुसरीकडे एलजीबीटीक्यू + प्राइड अँड इक्वॅलिटीचा झेंडा. तो म्हणतो, 'जसे की, आपण 71 व्या प्रजासत्ताक दिनाचा उत्सव साजरा करतो, दोन्ही झेंडे, देश आणि समानतेवर प्राइड समुदायाचा विश्वास दर्शवतो. आयुष्मान म्हणाला, "हे समलैंगिकता आणि एलजीबीटीक्यू समुदायासाठी भारताला एका प्रगतिशील मार्गाने दाखवते आणि आम्हाला भारतीय असण्याचा गर्व आहे."
21 फेब्रुवारीला होईल रिलीज
आयुष्मानचा आगामी चित्रपट 'शुभ मंगल ज्यादा सावधान' 21 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. चित्रपटात नीना गुप्ता, गजराज रावदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.