आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजम यांनी लोकसभेत मागितली माफी, 25 जुलैला रमा देवींसोबत केले होते गैरवर्तन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- सपा खासदार आजम खान यांनी लोकसभेत भाजपा खासदार रमा देवींविरुद्ध अभद्र विधान केले होते, त्यावर आता त्यांनी रमा देवींची माफी मागितली आहे. आजम यांनी आज(सोमवार) लोकसभेच्या कारवाई दरम्यान रमा देवींना आपली बहिण असल्याचे म्हटले, त्यावर रमा देवींनीही त्यांना खडे बोल सुनावले. त्या म्हणाल्या तुमचा स्वभाव गरजेपेक्षा जास्त बिघडलेला आहे. ही सवय जायला हवी. 


आजम सभागृहात म्हटले, "मी आधीही म्हटलो आहे की, त्या माझ्या बहिणीसारख्या आहेत. माझी कधीच त्यांच्या आपमान करण्याची भावना नव्हती. माझे भाषण आणि आचरणाबद्दल सभागृहातील सर्वांना माहिती आहे. तरिदेखील त्यांना असे वाटत असेल की, माझ्याकडून काही चूक झाली, तर मी त्यांची माफी मागतो."


आजम खानची ही सवय जायला हवी- रमा देवी
रमा देवी म्हणाल्या- "आजम खान यांच्या वक्तव्याने देशभरातील महिलांच्या स्वाभिमानाला ठेस लागली आहे. त्यांची ही सवय जायला हवी. ते सभागृहाच्या बाहेरही असे विवादीत वक्तव्य करतच असतात. त्यांच्या मनाला वाटेल तसे बोलू नये."
 

बातम्या आणखी आहेत...