आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azam Khan Kargil Statement News In Marathi, SP, UP

कारगिल वक्तव्यानंतर आझम अडचणीत, जवानांच्या पत्नी केस दाखल करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कारगिल युद्धाला मुस्लिम जवानांनी जिंकून दाखविले, असे वादग्रस्त वक्तव्य करुन समाजवादी पक्षाचे नेते आझम खान अडचणीत सापडले आहेत. या युद्धात लढलेल्या जवानांनी सांगितले आहे, की आझम खान यांच्याविरुद्ध इलाहाबादमध्ये धरणे आंदोलन आयोजित करण्यात येणार आहेत. दुसरीकडे, या जवानांच्या पत्नींनी सांगितले आहे, की आझम खान यांनी माफी मागितली नाही तर उच्च न्यायालयात दाद मागितली जाईल. आम्ही उत्तर प्रदेश सरकारकडे विनंती करतो, की आझम खान यांना मंत्रिमंडळातून लगेच बरखास्त करावे.
आझम खान यांच्या व्यक्तव्यावर चौफेर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे तर भाजपने त्यांना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे.
गाझियाबादमध्ये लष्कराचे जवान बहुसंख्य आहे. त्यांची मते मिळविण्यासाठी आझम यांनी हे वक्तव्य केले होते. परंतु, यामुळे त्यांच्या संकटांत भर पडली असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
आझम खान यांची सोशल नेटवर्किंग साईट्सवर कशी उडविली जात आहे खिल्ली, वाचा पुढील स्लाईडवर