आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Azam Khan News In Marathi, Samajwadi Party, Election

आझम खान यांचे \'\'गिरा तो भी टांग उपर\'\', वाचा कारगिल युद्धातील शहिदांची नावे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गाझियाबाद- हिंदू नव्हे तर मुस्लिम जवानांनी कारगिल युद्ध जिंकले होते, असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी केले आहे. यावर इतर राजकीय पक्षांनी जोरदार प्रहार केला असून निवडणूक आयोगाने या वादग्रस्त भाषणाची सीडी मागविली आहे.
लष्कराच्या जवानांमध्ये हिंदू-मुस्लिम असा भेद करून आझम खान यांनीच नव्हे तर समाजवादी पक्षाने वैचारिक दिवाळखोरी जाहीर केल्याचे दिसून येत आहे. चौफेर टीका होऊनही आझम खान म्हणतात, की तुम्ही कारगिल युद्धातील शहिदांची नावे वाचा. माझा मुद्दा तुम्हाला समजेल. दरम्यान, भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी फेसबुकवर कारगिल युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या नावांची यादी प्रसिद्ध केली आहे.
समाजवादी पक्षाचे नेते आझम खान कायम वादात असतात. गाझियाबाद येथील प्रचार सभेत ते म्हणाले, की कारगिल शिखराला अल्लाह-हो-अकबर असा नारा देत मुस्लिम जवानांनी जिंकले होते. तुम्ही आम्हाला कुत्र्याचे पिलू समजू नका. आमच्यावर विश्वास टाका.
आझम खान यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार करीत कॉंग्रेसने याची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजपनेही या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने आझम खान यांच्या भाषणाची सीडी मागितली असून त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी याच आझम खान यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी मुस्लिमांना कुत्र्याचे पिलू समजतात, असे म्हटले होते.
कारगिल युद्धातील शहिदांची नावे वाचा पुढील स्लाईडवर...