आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोकसभेत आजम खान यांच्या निलंबनाची मागणी, स्मृती ईराणी म्हणाल्या- 'संसद ही महिलांच्या डोळ्यात पाहण्याची जागा नाहीये...'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभेत शुक्रवारी सगल दुसऱ्या दिवशी आजम खान यांच्या वक्तव्यावर जोरदार हंगामा झाला. केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आजम खान यांनी माफी मागावी किंवा त्यांचे निलंबन करण्याची मागणी केली. तसेच भाजप खासदार स्मृती ईराणी म्हणाल्या, "हे प्रकरण फक्त महिलांपुरतेच नाहीये. हा सर्व खासदारांसोबत पुरुषांवरही दाग आहे. संसद ही महिलांच्या डोळ्यात पाहण्याची जागा नाहीये. संपूर्ण देशाने काल काय झाले ते पाहीले, याच सभागृहात महिलांना कामाच्या जागेवर होणाऱ्या आत्याचारावर विधेयक पासझाले होते. तुम्ही महिलांसोबत गैरवर्तन केल्यानंतर ड्रामा करू शकत नाहीत."


तृणमूल खासदार मिमी चक्रवर्ती म्हणाल्या," संसदेत कोणी उभे राहून मला तुमच्या डोळ्ताय पाहावे वाटते असे महिलांना म्हणू शकत नाही." या सर्व गोंधळानंतर दुपारी 2 पर्यंत सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. अध्यक्ष ओम बिरला यांनी याबाबत सर्व पक्षांची बैठक घेण्याचे म्हटले, त्यानंतरच निर्णय होईल. भाजप खासदार अनुराग ठाकूर यांनी आजम खान संसदेच्या बाहेरही महिलांचे अपमान करतात असे म्हटले.
 

बातम्या आणखी आहेत...