आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेत आक्षेपार्ह वक्तव्य : ‘बदजुबान-ए-आझम’ना माफीच मागावी लागेल, अन्यथा निलंबन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भाजप खासदार रमादेवी यांच्याबद्दल असभ्य भाषा वापरणारे समाजवादी पक्षाचे खासदार आझम खान यांच्यावर लोकसभेत प्रचंड टीका झाली. एक तास चाललेल्या चर्चेत सर्वच पक्षांच्या २१ खासदारांनी या द्वैअर्थी टिपणीवर आक्षेप घेतला. यात १२ पुरुष व ९ महिला खासदार होत्या. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, तृणमूल, द्रमुक आणि बिजदसह बहुतांश पक्षांनी आझम यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली. चर्चा सुरू असताना आझम सभागृहात आले नाहीत. दरम्यान, दुपारनंतर आझम २५ मिनिटे सभागृहात गप्प होते. आझम यांनी जाहीर माफी मागावी, असे सभापती त्यांना सांगतील. अन्यथा कारवाई होईल. घटनातज्ज्ञ पी. डी. टी. आचारी यांच्यानुसार, आझम यांनी सभापतींच्या निर्देशांनुसार जाहीर माफी मागितली नाही तर त्यांना निलंबित करण्याचा अधिकार सभापतींना आहे.


अशी कारवाई व्हावी की कठोर संदेश गेला पाहिजे...
आझम यांचे वक्तव्य खासदारांवर कलंक

आजवर संसदेत कुणीही हे धाडस केले नाही. हा केवळ महिलांवरच नव्हे, तर पुरुषांवरही कलंक आहे. संसदेत कुणीही महिलांच्या डोळ्यात डोळे घालून पाहण्यासाठी येत नाही. गैरवर्तनाचा बचाव व्हायला नको.  - स्मृती इराणी


एक महिला या पदापर्यंत यावी हे सोपे नाही
संसदेतील घटनाक्रम संपूर्ण देशाने पाहिला आहे. कठोर कारवाई करून आपण तसा संदेश दिला पाहिजे. पीठासीन महिलांचा, विशेषत: सर्वच महिलांचा सन्मान व्हायलाच हवा. एक महिला या पदापर्यंत पोहोचणे सोपे नाही. - निर्मला सीतारमण


मीटू केसमध्ये एम. जे. अकबर यांच्यावरील आरोपाबाबतच्या अहवालाचे काय?
आझम यांच्यावर कारवाई करण्यासंबंधी सदस्यांच्या मतांचा मी आदर करतो. मात्र, मीटू प्रकरणात गेल्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले एम. जे. अकबर यांच्यावरील अहवालाचे काय झाले? - असदुद्दीन ओवेसी

बातम्या आणखी आहेत...