आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विप्रोचे प्रेमजी यांनी आणखी 52,750 कोटी रुपयांचे शेअर केले दान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू  - अझीम प्रेमजी यांनी विप्रोमधील त्यांच्या मालकीचे ३४ टक्के शेअर परोपकारासाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. रकमेच्या दृष्टीने त्याचे ५२,७५० कोटी रुपये होतात. प्रेमजी देशातील तिसरी सर्वात मोठी आयटी कंपनी विप्रोचे अध्यक्ष आहेत. ते अझीम प्रेमजी फाउंडेशनच्या माध्यमातून परोपकाराचे काम करतात. यामध्ये त्यांनी आतापर्यंत १.४५ लाख कोटी रुपये दान केले आहेत. डिसेंबर २०१८ मध्ये विक्रीमध्ये संचालकांची भागीदारी ७४.३ टक्के होती.  समाजसेवेसाठी तयार करण्यात आलेले अझीम प्रेमजी फाउंडेशन मुख्यत्वे शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. शालेय शिक्षणाची प्रणाली अधिक सक्षम बनवणे हा त्यांचा उद्देश आहे. 


फाउंडेशन या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक एनजीओंना आर्थिक मदत करते. सध्या हे फाउंडेशन कर्नाटक, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगड, पुद्दुचेरी, तेलंग, मध्य प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये सक्रिय आहे.  १५० पेक्षा जास्त एनजीओंना पाच वर्षात या फाउंडेशनकडून फंड मिळाला आहे. 

बातम्या आणखी आहेत...