रागावला नाहीत, तर एकमेकांविषयी प्रेम, विश्वास आणि आदर वाढेल

रागावला नाहीत, तर एकमेकांविषयी प्रेम, विश्वास आणि आदर वाढेल

रिलिजन डेस्क

Mar 20,2020 04:34:41 PM IST

आपण असे अनेक आई-वडील पाहिले आहेत, ज्यांची मुले शिक्षणासाठी विदेशात जातात. आई-वडील फाेन करून त्यांना उठवतात, पुन्हा १० मिनिटांनी फाेन करतात की, ताे उठला नसावा. कारण आपण त्याच पद्धतीने चालत आलाे आहाेत. मग म्हणू लागताे की, मुलांना उठवण्यासाठी रागवावे लागते, आॅफिसमध्ये काम करण्यासाठी रागवावे लागते, जणू ही कार्यशैली बनलीय. काही दिवसांनी विचार करणेच बंद हाेते आणि राग आपाेआप येऊ लागताे. मग आपण म्हणू लागताे - राग येणे ही तर सामान्य बाब आहे. भलेही आसपास हे पाहायला मिळेल की रागाने बाेलल्यावर काम लवकर हाेते. जर काेणाला सांगितले की टेबल बाजूला सरकव, तर उत्तर येईल -आता बाजूला सरकवताे... प्लीज, टेबल बाजूला सरकवा म्हटले तर... लगेच बाजूस करताे, असे एेकायला मिळेल. परंतु जरा थाेडासा आवाज चढवून बाेलाल तर टेबल तत्काळ हटेल.


तात्पर्य, आवाज चढवून किंवा रागाने बाेललाे की काम तत्काळ हाेते हे सिद्ध हाेते. वेळ कमी असेल तेव्हा आपण या तिन्ही पद्धतींचा वापर करण्याएेवजी तेट रागानेच आवाज चढवून बाेलू. कारण रागाने बाेलले की काम लवकर हाेते हे कळून चुकलेले हाेते. मग काेणाशीही बाेलताना रागानेच बाेलू लागताे. कारण तसा संस्कारच स्वत:वर करून घेतलेला असताे. केवळ ही बाब आॅफिसपुरती मर्यादित राहत नाहीत, तर सायंकाळी घरी आल्यानंतरही सर्वांशी रागानेच बाेलू लागाल. मग त्याचा प्रभाव मुलांवर पडताे. आपण कुटुंबीयांना आनंद देऊ इच्छित हाेताे आणि प्रत्यक्षात काय देत आहाेत? जितका राग आपण त्यांच्यावर काढत आहाेत तेदेखील तसेच बनत चालले आहेत. पुन्हा आपणच म्हणत असताे की, आजकाल मुले आणि तरुण पाहा कसे बनले आहेत?


आजकालच्या मुलांमध्ये काहीही बदललेले नाही, परंतु पूर्ण दिवस आपण त्यांना काेणती एनर्जी देत आहाेत आणि हे सगळे एवढ्यामुळेच हाेते की आपणच ठरवलेले असते- रागावल्याने कामे लवकर हाेतात. रागावल्याने आपले मन, शरीर आणि नात्यांचे नुकसान हाेते तरीही आपण म्हणताे की काम झाले. काम लवकर का करायचे हाेते? कारण नफा वाढेल. जितका फायदा हाेईल त्यामुळे आपल्या घरात पैसा येईल, पैसा अधिक आला तर आनंद वाढेल. अखेर आनंदप्राप्तीसाठी हे सारे करीत राहिलाे, जे याेग्य नव्हते.


आता रागाएेवजी प्रेमाने काम करूया. काय हाेईल? काम हळूहळू हाेईल, कदाचित नफा कमी हाेईल. परंतु असे हाेत नाही. राग न केल्यामुळे एक तर आनंद वाढताे, सहकाऱ्यांसाेबत काम करण्याची इच्छाशक्ती वाढते. कारण एकमेकांवर आेरडणे थांबलेले असते. एकमेकांविषयी प्रेम, विश्वास, आदर वाढलेला असताे. कारण वागण्याची चुकीची पद्धत बदललेली असते. जेव्हा हा सगळा बदल आपल्यात हाेताे तेव्हा घरी गेल्यानंतर मुलांसाेबतचे वागणेदेखील बदललेले असते.


बी.के. शिवानी, ब्रह्माकुमारीज

X