आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्य एक्स्प्रेस वे नाही, त्याला स्पर्धेचे रूप देऊ नका

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बी.के. शिवानी, ब्रह्माकुमारीज
जर आपण मनाची गती कमी केली नाही तर त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होण्यास सुरुवात होते. जेव्हा डॉक्टर आपल्याला दररोज एक तास चालण्यास सांगतात तेव्हाच आपण हे करतो. अनेक वेळा आपण तेही फारसे गांभीर्याने घेत नाही आणि असे म्हणतो की, आपल्याकडे यासाठी वेळ नाही. आपण स्वतःला असे विचारत नाही की, आपण हे असे का करतो? आपण ज्या गोष्टींसाठी धावतो त्याची कारणं काय आहेत? असे तर नाही ना की, सगळेच पळत आहेत म्हणून आपणही धावतोय. आपण आयुष्याला एक स्पर्धा बनवलं आहे. विचार करा की, आमच्या मुलांची स्पर्धा आहे, आम्हीदेखील याचा सामना करत आहोत, नातेवाइकांमध्ये स्पर्धा आहे, व्यवसायात स्पर्धा आहे. तुम्ही किती भाज्या शिजवल्या आहेत याबद्दलही बरीच स्पर्धा आहे. स्पर्धेला कोणताही स्तर नाही. स्पर्धा जितकी जास्त होईल तितकी अधिक चिडचिड सुरू होते.

समजा मुंबई ते पुणे तुम्ही तुमची गाडी घेऊन एक्स्प्रेस वेवर निघाला आहात. तुम्हाला तुमच्या गाडीची क्षमता माहीत आहे, पण यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुम्ही कार चालवता कशी? काही लोक गाडी ५०,८०,१०० च्या वेगाने किंवा काही लोक यापेक्षा अधिक वेगाने चालवतात. हा आपल्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण वेळ असतो. जेव्हा आपण आपल्या गाडीत आपल्या कुटुंबासोबत अगदी आनंदाने प्रवास करताय. काही वेळातच एक गाडी तुमच्या गाडीपेक्षा अधिक वेगाने पुढे निघून जाते. त्याच वेळी आपण विचार करतो की, चला स्पर्धा लावूया. स्पर्धा नसते, पण आपल्या एका विचाराने ही स्पर्धा बनते. आम्हीही त्याच रस्त्यावर होतो. पण एका विचारानंतर आपली यात्रा कशी असेल?

आता आमचं लक्ष हे कुटुंबावर नाही तर गाडीच्या वेगावर केंद्रित झाले. आता बायको आणि मुलं काही बोलले तर त्यांना रागावले जाईल. आता सर्व लक्ष हे गाडीच्या वेगाच्या स्पर्धेवर केंद्रित होईल. आता याची शक्यता आहे की आपल्या गाडीपेक्षा त्यांच्या गाडीची क्षमता ही जास्त चांगली असेल. मी मारुती गाडीच्या सर्व क्षमतांना पार केले तरीही त्यांच्या गाडीपेक्षा पुढे जाता आले नाही. त्यानंतर एक चौक लागतो. तिथं ट्रॅफिक सिग्नल आला. आता हीच वेळ आहे त्यांच्यापेक्षा पुढं जाण्याची. आता यात्रेचे रूपांतर स्पर्धेत होते. आता मी आधी पोहोचलो नाही तर ते पुढे जातील. पोहोचणार तर दोघेही आहेत, पण हा प्रवास कसा झाला? या प्रवासादरम्यान आम्ही सर्व वाहतुकीचे नियम मोडले, गतीची क्षमता वाढवली, एखादा अपघातसुद्धा घडला असेल. हे फक्त एका विचारामुळे झाले. आपण आयुष्य दुसऱ्यांचं बघून जगू नये. आपल्या क्षमतांनुसार नियोजन करावे. आयुष्याला कधीच प्रतिस्पर्धी रूपात बघू नये.

बातम्या आणखी आहेत...