आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बी.के. शिवानी, ब्रह्माकुमारीज
कधी लहानसहान गाेष्टींतून तर कधी माेठ्या बाबीतून आनंद मिळत असताे. परंतु हा आनंद प्राप्त करण्यासाठी आपणास बऱ्याच वेळा बराच काही त्याग करावा लागताे. तुम्ही खुश असाल तर मी खुश असेन हे समीकरण ठीक आहे. समजा समाेरील व्यक्ती जर चिंता आणि तणावाने ग्रासलेली असेल तर ती खुश हाेऊ शकत नाही. काही दिवसांपूर्वीचीच गाेष्ट आहे. आमच्या शेजाऱ्याकडे वाहन नव्हते. या शेजाऱ्याच्या पत्नीने पतीच्या वाढदिवसाचे आैचित्य जाणून माेठ्या कष्टाने शर्ट विकत आणला, ताे पतीला आवडला नाही. ताे म्हणाला, मी हा शर्ट रात्री घालून झाेपेन. बिचाऱ्या पत्नीला वाईट वाटले. तिने विचार केला की पती खुश झाला तर मलाही आनंद मिळेल. परंतु तसे झाले नाही. कुठे ना कुठे आपण असे समीकरण निश्चित करून घेतले आहे की, जेव्हा माझ्या आसपासचे लाेक खुश असतील तेव्हा आनंदी हाेईन.
माझ्या आसपासचे लाेक आजारी आहेत आणि मी आनंदी राहू असे कसे शक्य आहे, यामध्ये स्वार्थाची काेणतीच गाेष्ट नाही. त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी अगाेदर आपणास स्वत:कडे लक्ष द्यावे लागेल. इतरांना आनंदी ठेवण्यासाठी केवळ कामावर लक्ष केंद्रित करणेच जरुरी नाही, की मी हे करीन, मी ते करीन तर सगळे खुश हाेतील. याचा मूलमंत्र हाच की- मी खुश तर सारे खुश. कितीतरी वेळा आपणच म्हणताे- मी आनंदी असलेले तुम्हाला पाहवत नाही. इतरांची मानसिक स्थिती आणि त्याचे वर्तन यावर आपल्या मनाची स्थिती अवलंबते आहे. सकाळी माझा मूड ठीक हाेता, परंतु तुमचा नव्हता त्यामुळे त्रस्त आहे. यास तुम्हीच दाेषी आहात, असेही कधी-कधी एेकिवात येते. खरे तर एखाद्याचा मूड ठीक नसेल तर त्याच्या मन:स्थितीवर नियंत्रण नसल्याचे द्याेतक आहे. ती चूक त्या व्यक्तीची असते. आपल्या जीवनातील काही समीकरणेच ठीक नाहीत त्यामुळे अनेकदा वाद, गाेंधळ निर्माण हाेत असतात.
मुले चांगल्या मार्कांनी उत्तीर्ण झाली तर मला आनंद वाटेल, नाेकरी मिळेल, लग्न हाेईल तेव्हा मी आनंदी हाेईन, अशा कल्पनेत रमत असताे. मुले आनंदी असतात तेव्हा खुश असताे, अशा वेळी बाॅसचा फाेन येताे ताे कुठल्या तरी कारणावरून नाराजी व्यक्त करताे, तेव्हा आपण अचानक व्यथित हाेताे. या वातावरणात आनंद लाेप पावण्यास एक क्षणही लागत नाही. आपलं जीवन परिस्थितीवर अवलंबून आहे, हे मान्य. लाेकांचा मूड, स्वभाव-संस्कारावर माझी मन:स्थिती निर्भर झाली आहे, तर मी कसा खुश हाेऊ शकेन? अशा बाह्य वातावरणात आपणास आंतरिक खुशी कशी निर्माण करता येईल? आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी झाली की साऱ्या प्रकारचे सांसर्गिक आजार जडतात. त्याचप्रमाणे आपल्या मनाकडे चांगल्या पद्धतीने लक्ष दिले तर बाह्य वातावरण, स्थितीचा मनावर काहीही परिणाम हाेणार नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.