आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

''कर्ज होता तो उतार भी देता-कम्बख्त इश्क था...'' रात्री 2 वाजता युवकाने अशी फेसबुक पोस्ट लिहिली, सकाळी मित्र रूमवर पोहचले तेव्हा पैसे गायब होते आणि मित्र लटकला होता दोरीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फर्रुखाबाद(उत्तरप्रदेश)- फर्रुखाबादच्या कमालगंज परिसरातील आजाद नगरमध्ये एका युवकाचा मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत आढळला. सकाळी मित्र रूमवर पोहचले तेव्हा घटनेची माहिती मिळाली. घर मालकाच्या सुचनेनंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. युवकाच्या शरिरावर जखमांचे निशान होते, कुटुंबीयांनी खूनाचा आरोप लावला आहे. काय आहे प्रकरण...

 


सैन्यात भर्ती होणार होता मनीष

- कानपूरच्या मनोवरपूरमध्ये राहणारा मनीष यादव(20) कमालगंजच्या आर.पी. कॉलेजमध्ये बी.ए. तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. 
- मनीष आजाद नगरमध्ये राहणाऱ्या राम मोहन मिश्राच्या घरात किरायाने राहत होता. 20 मार्चला त्याला आर्मीच्या ट्रेनिंगवर जायचे होते. यादरम्यान त्याला कोणालातरी पैसे द्यायचे होते.

 


बहिणीकडून घेतले होते 50 हजार
- मनीषने गुरूवारी आपल्या दोन बहिणींकडून प्रत्येकी 50 हजार रूपये घेतले होते. शुक्रवारी सकाळी त्याचे दोन मित्र त्याला बोलवायला गेले. त्याच्या रूमचे दार उघडे असल्याने त्यांनी रूममध्ये प्रवेश केला. 
- त्यांनी आत पाहिले की, मनीषचा मृतदेह पंख्याला लटकलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर आणि अंगावर अनेक जखमांचे निशान होते आणि त्यातून रक्त ये होते. शिवाय त्याच्या रूममधून त्याचे सगळे पैसेदेखील गायब होते.

 


फेसबूकवर ही होती शेवटची पोस्ट 
- मनीषने गुरूवारी रात्री दोन वाजता फेसबूकवर एक पोस्ट टाकली. त्यात त्याने लिहीले ''कर्ज असते तर फेडले असते, पण हे प्रेम होते, जे मनातून उतरले नाही, लव्ह यू सनम. तू तुझे पेपर नाही सोडले तर आयुष्यच हिरावून घेतलस, जग तू तुझं आयुष्य आरामाने, नाही येणार तुझ्या आयुष्यात.''

 


शवविच्छेदन अहवालात ही माहिती समोर आली
- डॉ. विवेक दुबे आणि डॉ. सोमेश अग्निहोत्रीच्या पॅनलने मनीषचे पोस्टमॉर्टम केले. सुत्रानुसार पोस्टमार्टममध्ये मनीषच्या ओठ, हणवटी आणि उजव्या डोळ्यावर जखमांचे निशान आहेत. मृत्यूचे कारण फाशीच आहे.
- पोलिस अधिक्षक प्रदिप चव्हाण म्हणाले की, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंर तपासाला सुरूवात करू. दोषींवर कडक कारवाई केली जाईल.

बातम्या आणखी आहेत...