आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना व्हायरसच्या सावटानंतरही 'बागी 3'ची दमदार सुरुवात, पहिल्या दिवसाच्या कमाईत 'तान्हाजी'ला टाकले मागे

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः टायगर श्रॉफ स्टारर फिल्म 'बागी 3' ने बॉक्स ऑफिसवर धमाकेदार सुरुवात केली आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, देशात कोरोना व्हायरसची भीती असूनही पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 17.50 कोटींचे कलेक्शन केले केले. यासह, हा अजय देवगन स्टारर 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'ला मागे  टाकत 2020 चा मोठा ओपनर चित्रपट ठरला आहे. 'तान्हाजी'ने पहिल्या दिवशी 15.10 कोटी रुपये कमावले होते.

आदर्श यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, "कोरोना व्हायरसचा भय, प्री-होली, परीक्षेचा काळ...  असूनही 'बागी 3'ची मोठी सुरुवात झाली आहे. 2020 मधील सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. टायगर श्रॉफचा 5 वा चित्रपट ज्याने दुहेरी आकड्यात ओपनिंग केली. सिंगल स्क्रीनमध्ये एक्सीलन्स आणि मल्टीप्लेक्समध्ये डिसेंट ठरला. पहिल्याच दिवशी त्याने भारतात 17.50 कोटी रुपये कमावले."

2020 चे आतापर्यंतचे टॉप 5 ओपनर्स 

क्र.चित्रपटरिलीज डेटपहिल्या दिवसाचे कलेक्शन 
1 बागी 3 6 मार्च17.50 कोटी
2तान्हाजी: अनसंग वॉरियर10 जानेवारी 15.10 कोटी
3लव आज कल14 फेब्रुवारी12.40 कोटी
4स्ट्रीट डान्सर 3 डी24 जानेवारी10.26 कोटी
5शुभ मंगल ज्यादा सावधान21 फेब्रुवारी 9.55 कोटी

टायगरचा तिसरा सर्वात मोठा ओपनर

ओपनिंग कलेक्शनच्या बाबतीत, 'बागी 3' टायगर श्रॉफचे मागील दोन चित्रपट 'वॉर' आणि 'बागी 2'ला मागे टाकण्यात अपयशी ठरला. 2 ऑक्टोबर 2019 रोजी रिलीज झालेल्या 'वॉर' ने पहिल्या दिवशी 53.35  कोटी रुपये कमावले, तर  30 मार्च 2018 रोजी रिलीज झालेल्या 'बागी 2' चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 25.10 कोटी रुपये होते.

टायगरचे टॉप 5 ओपनर्स 

क्र.चित्रपटरिलीज डेटपहिल्या दिवसाची कमाई
1वॉर       2 ऑक्टोबर 2019 रुपये53.35 कोटी
2बागी 2         30 मार्च 201825.10 कोटी
3बागी 3    6 मार्च 202017.50 कोटी
4स्टुडंट ऑफ द इयर 210 मे 2019  12.06 कोटी
5बागी30 एप्रिल 201611.94 कोटी

अहमद खान यांचे दिग्दर्शन


6 मार्च रोजी रिलीज झालेल्या 'बागी 3' चे दिग्दर्शन अहमद खान यांनी केले आहे. या फ्रेंचायझीच्या दुसर्‍या भागाचेही ते दिग्दर्शक आहेत. चित्रपटात टायगरसह श्रद्धा कपूर, रितेश देशमुख, अंकिता लोखंडे, जयदीप अहलावत, जॅकी श्रॉफ, आशुतोष राणा, सतीश कौशिक आणि मानव गिल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.  दिशा पाटनीने 'डू यू लव मी' या गाण्यात स्पेशल अपिअरन्स दिला आहे.