आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बागी 3' ने 3 दिवसात केला 53.83 कोटींचा व्यवसाय, 'तान्हाजी'च्या पुढे जाऊ शकला नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 'बागी 3' या चित्रपटाने तीन दिवसांत घरगुती बॉक्स ऑफिसवर 50 कोटींचा आकडा पार केला आहे. देशात कोरोना व्हायरसचे सावट आणि परीक्षेचा काळ असूनही हा चित्रपट चांगली कामगिरी करत आहे. व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांच्या ट्विटनुसार, अहमद खान दिग्दर्शित 'बागी 3' ने शुक्रवारी 17.50 कोटी, शनिवारी 16.03 कोटी कमावले आणि रविवारी चित्रपटाने 20.30 कोटींची कमाई केली. तीन दिवसांचा एकूण व्यवसाय 53.83 कोटींवर गेला आहे.

  • पहिल्या आठवड्यात 'तान्हाजी'च्या मागे राहिला

टायगर श्रॉफ स्टारर बागी 3 हा पहिल्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत अजय देवगण स्टार 'तान्हाजी: द अनसंग वॉरियर'ला मागे टाकत 2020 मधील  आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनर ठरला होता. पण शनिवार व रविवारच्या बाबतीत तो 'तान्हाजी'पेक्षा मागे राहिले आहे. ओम राऊत दिग्दर्शित अजय देवगणच्या चित्रपटाने पहिल्या शनिवार व रविवारमध्ये 61.75 कोटींची कमाई केली होती.

  • दोन्ही चित्रपटांचे सुरुवातीच्या तीन दिवसांचे कलेक्शन

बागी 3तान्हाजी: द अनसंग वॉरियर
शुक्रवार17.50 कोटी रुपये15.10 कोटी रुपये
शनिवार16.03 कोटी रुपये20.57 कोटी रुपये
रविवार20.30 कोटी26.08 कोटी
एकूण (पहिला विकेण्ड)53.83कोटी रुपये61.75 कोटी रुपये

  • 2020 चे आतापर्यंतचे टॉप 5 विकेण्ड ओपनर

रँकचित्रपटरिलीज डेटपहिल्या विकेण्डचे कलेक्शन
1तान्हाजी: द अनसंग वॉरियर10 जानेवारी61.75 कोटी
2बागी 36 मार्च53.83 कोटी
3स्ट्रीट डान्सर 3 डी24 फेब्रुवारी39 कोटी
4शुभ मंगल ज्यादा सावधान21 फेब्रुवारी32.66 कोटी
5लव आज कल14 फेब्रुवारी26 कोटी

  • पहिल्या विकेण्डला टायगरचा तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

टायगर श्रॉफबद्दल बोलतांना, 'बागी 3' पहिल्या विकेण्डच्या कलेक्शनमध्ये त्याच्या कारकिर्दीतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. सर्वात वरच्या क्रमांकावर आहे 'वॉर', ज्याने पहिल्या विकेण्डला 166.25 कोटींची कमाई केली. बुधवार (2 ऑक्टोबर 2019) रोजी रिलीज ढालेल्या 'वॉर'ला 5 दिवसाचा विकेण्ड मिळाला होता.

  • टायगचे टॉप 5 वीकेंड ओपनर

रँकचित्रपट  पहिल्या विकेण्डचे कलेक्शन
1वॉर (2019)166.25 कोटी
2बागी 2 (2018)73.10 कोटी
3बागी 3 (2020)53.83 कोटी
4स्टुडंट ऑफ द इयर (2019)38.83 कोटी  
5बागी (2016)38.58 कोटी