आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बागी 3'चा दिग्दर्शक अहमद खानने उपस्थित केले 'थप्पड' च्या संकल्पनेवर प्रश्न, तापसीने दिले सडेतोड उत्तर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः 'बागी 3'चा दिग्दर्शक अहमद खानने अलीकडेच दिलेल्या मुलाखतीत तापसी पन्नू अभिनित चित्रपट ‘थप्पड’च्या संकल्पनेवर प्रश्न निर्माण केले आहेत. अहमद म्हणाले, ‘मला थप्पडची संकल्पना खूपच विचित्र वाटली. जर पतीने पत्नीला चापट मारली तर पत्नीने पती कायमसाठी सोडून देणार? हे मला समजलेच नाही. जर तिला याबाबत वाईट वाटले तर तिनेही पतीला दोन चापटा माराव्या.


अहमद पुढे म्हणाले, जर माझ्या पत्नीला मी चापट मारली तर ती मला चापट मारून भांडण मिटवू शकते. मी जर तिला म्हणालो की, मला तुझ्या सोबत राहायचे नाही तर, ती पण हे म्हणू शकते. परंतु, एक चापट ठरवेल का जोडप्याने एकत्र राहावे की राहू नये? खरं तर प्रत्येकाचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो आणि परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असू शकतो.


अहमदच्या या प्रतिक्रियेवर चित्रपटातील प्रमुख अभिनेत्री तापसी पन्नूने उत्तर दिले. ती म्हणाली, ‘ते त्याच मु्द्यावर चित्रपटाची निर्मिती करतात जे त्यांना योग्य वाटते आणि आम्हीदेखील असेच करतो. शेवटी प्रेक्षकच अंतिम निर्णय देतात.‘