आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएंटरटेन्मेंट डेस्कः अनुष्का शेट्टीचे घटस्फोटित दिग्दर्शकासाेबत संबंध आहेत आणि ते लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. आत अनुष्का या सर्व गोष्टी अफवा असल्याचे सांगत आहे. ती म्हणाली,’मला कळतंच नाही की अशाप्रकारच्या बातम्या कोणी कसे काय लिहू शकतात?’ जर कुणी अशा खोट्या बातम्या छापल्या असतील तर यामुळे संपूर्ण कुटुंबावर याचा परिणाम होतो. यातील कोणतीही बातमी खरी नाही. माझ्यावर अशा अफवांचा काहीच परिणाम होत नाही. माहित नाही, पण माझ्या लग्नाबाबत कुणाला काय देणेघेणे आहे. कुणीही आपले संबंध लपवू शकत नाही, मग मी लग्नाबाबत का सांगणार नाही. लग्न हे पवित्र बंधन आहे आणि ज्यावेळी ते होणार तर सर्वांना माहित होईलच.’
दिग्दर्शकासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा
अनुष्काचे नाव ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभाससोबतही जोडले गेले होते. त्यानंतर बातमी आली होती की, तिचे साऊथ फिल्म इंडस्ट्रीच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाशी अफेयर आहे. राघवेंद्र रावचा मुलगा प्रकाश कोवलमुदीसोबत ती रिलेशनशिपमध्ये असून लवकरच दोघे लग्न करणार असल्याची चर्चा आहे. प्रकाशने 2014 मध्ये लेखिका कनिका ढल्लनबरोबर पहिले लग्न केले होते, परंतु काही काळानंतर दोघे विभक्त झाले आणि 2017 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. 2019 मध्ये 'जजमेंटल है क्या' हा हिंदी चित्रपट प्रकाश यांनीच दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट कनिकाने लिहिला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.