आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्यातील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली, खडकवासला धरण भरल्यामुळे मुठा नदीत पाणी सोडण्यात आले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- जोरदार पावसामुळे राज्यातील अनेक धरणे तुडुंब भरली आहेत, त्यामुळेच या धरणांचे दरवाजे उघडून पाणी सोडले जात आहे. यातच पुण्याजवळील खडकवासला धरण भरल्यामुळे, धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात आले. हे पाणी सोडल्यामुळे पुण्यातील डेक्कन परिसरात असलेला बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे.

 

राज्यात पावसाने जोर धरला आहे, त्यातच पुण्याजवळील खडकवासला धरण भरल्यामुळे पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. नदीतील पाणी पातळी वाढल्यामुळे डेक्कनमधील बाबा भिडे पूल पुन्हा पाण्याखाली गेला आहे. खडकवासला धरण साखळीत रात्रभर सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळे सकाळी 10 वाजता धरणातून 13980 क्युसेसने पाणी मुठा नदीत सोडण्यात आले. यामुळे नदीपात्रातील रस्ते पाण्याखाली गेले असून परीसरातील वाहतुक पोलीसानी थांबवली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या रहिवाश्याना सावधानतेचा इशारा दिला आहे. तर परीसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

 

मागील आठवड्याभरापासून शहरात दमदार पाऊस बरसत आहे. यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्याऱ्या खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. या चार धरणांपैकी खडकवासला धरण 100 टक्के भरले. 13980 क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला. यामुळे झेड ब्रीज खालील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...