आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमळनेर : बाबा बोहरी हत्याकांड; चारही आरोपींविरुद्ध 'मोक्का 'अंतर्गत कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमळनेर- शहरातील बाबा बोहरी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कैलास नवघरेसह चारही आरोपींविरुद्ध 'मोक्का 'अंतर्गत कारवाई केली असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक रफिक शेख यांनी दिली. 


न्यू प्लॉट भागातील पेट्रोल पंप मालक बाबा बोहरी यांची ३ मे रोजी घरी परतताना गावठी पिस्तूल मधून गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग व स्थानिक पोलिसांच्या मदतीने गांधलीपुरा भागातून तन्वीर शेख मुख्तार, तौफिक शेख मुशिरोद्दीन व मुस्तफा शेख महंमद याना २० मे रोजी अटक करण्यात आली होती. मुख्य आरोपी सराईत गुन्हेगार कैलास रामकृष्ण नवघरे यास २५ रोजी घाटकोपर येथून अटक करण्यात आली होती. अटकेनंतर चारही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तेव्हापासून ते जळगाव जिल्हा कारागृहात आहेत. या चारही आरोपींविरुद्ध पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांनी 'मोक्का' प्रमाणे कारवाईचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक शेरिंग डोर्जे यांच्याकडे पाठवला होता. शनिवार, १८ रोजी डोर्जे यांनी चारही आरोपीना 'मोक्का' लावण्याचे आदेश दिले. 

बातम्या आणखी आहेत...