आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोल्डन ग्लोब्ज'मध्ये प्रदर्शित होणार 'बाबा'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐकू आणि बोलू न शकणाऱ्या वडील आणि मुलाची भावुक कथा असलेल्या 'बाबा' या मराठी चित्रपटाचे प्रदर्शन 'गोल्डन ग्लोब्ज-लॉस एंजलीस'मध्ये होणार आहे, अशी माहिती या चित्रपटाचे निर्माते 'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स'च्या अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार आणि 'एसडीपी' यांनी दिली. दीपक दोब्रीयाल यांच्या अभिनयाने नटलेल्या आणि नंदिता पाटकर व बालकलाकार आर्यन मेंघजी यांचा अभिनय असलेल्या या चित्रपटाचा जागतिक स्तरावर सन्मान झाला आहे. 'ब्ल्यू मस्टँग क्रिएशन्स' लवकरच अत्यंत गुणी कलाकार चमुबरोबरच्या आपल्या तिसऱ्या चित्रपटाची घोषणा करणार आहे. ५ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या 'गोल्डन ग्लोब्ज'च्या नामांकनाच्या यादीत हा चित्रपट प्रवेश करेल, असे अशोक सुभेदार आणि आरती सुभेदार यांनी सांगितले.