Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Babaji and Ravikanth Tupkar met in Verul

बाबाजी आणि रविकांत तुपकर यांची वेरूळात भेट, बंद खोलीत झाली चर्चा...

प्रतिनिधी | Update - Jan 11, 2019, 08:00 PM IST

राजकीय वर्तुळात खळबळ.

  • Babaji and Ravikanth Tupkar met in Verul
    वेरुळ- निष्काम कर्मयोगी जगदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज धर्मपीठाचे उत्तराधिकारी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी गुरुवारी रात्री भेट घेत बंद खोलीत चर्चा केली. स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली परराज्यासह राज्यभरातील जय बाबाजी भक्त परिवारांनी एकत्र येत राजकारणाच्या शुद्धिकरणासाठी वज्रमुठ अधिक घट्ट केली असून, याच अनुषंगाने सध्यस्थितिला अनेक राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी सध्या बाबाजींच्या दर्शनासाठी येत खाजगीत बैठका करीत आहेत. यासाठीच रविकांत तुपकर यानींही बाबाजींची वैयक्तिक भेट घेत बंद खोलीत चर्चा केली. या बैठकीचा सार जरी बाहेर आला नसला तरी ही भेट राजकीय असल्याचे सूत्राकड़ून कळते.

Trending