आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामजन्मभूमीवर मशीद बांधून बाबराने ऐतिहासिक चूक केली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : अयोध्या वादावर सुरू असलेली सुनावणी बुधवारी पूर्ण करून सर्वोच्च न्यायालय निकाल राखून ठेवू शकते. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी तसे संकेत मंगळवारी दिले. तत्पूर्वी हिंदू पक्षकारांनी बाजू मांडताना नमूद केले की, श्रीरामांचे जन्मस्थळ असलेल्या मंदिराच्या जागी मशीद उभारून मोगल शासनकर्ता बाबर याने मोठी चूक केली. ही चूक सुधारण्याची आता खरी वेळ आली आहे.


अयोध्येत ५०-६० मशिदी आहेत. या मशिदीत मुस्लिम लोक नमाज पठण करू शकतात. मात्र, हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीरामांचे जन्मस्थळ बदलू शकत नाही. या सुनावणीदरम्यान मुस्लिम पक्षकारांचे वकील राजीव धवन यांनी हे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे अॅड. धवन व अॅड. वैद्यनाथन यांच्यात शाब्दिक चकमक उडाली.

हिंदू पक्षकारांच्या वतीने अॅड. सी. एस. वैद्यनाथन यांनी युक्तिवाद केला.
वैद्यनाथन : मला बुधवारी एक तास अिधक वेळ हवा आहे.
सरन्यायाधीश : युक्तिवाद लेखी द्या. अधिक वेळ मिळणार नाही.
वैद्यनाथन : आम्ही गंभीर प्रकरणात युक्तिवाद करून बाजू मांडत आहोत. आमचे म्हणणे एेकून घेतले पाहिजे.
यावर सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, मग ठीक आहे. दिवाळीपर्यंत अशीच सुनावणी करत राहू.'
वैद्यनाथन : वादग्रस्त जागेवर जे देव आहेत तेच येथील पहिले मालक आहेत.
अॅड. धवन : असे मुद्दे मांडू शकत नाहीत...
वैद्यनाथन : धवन यांना या लढाईत हताश व्हावे लागत आहे...

मंगळवारी पूर्ण दिवस हिंदू पक्षकारांचा युक्तिवाद ऐकून घेतला, आज मुस्लिम पक्षकार मांडणार भूमिका
सुप्रीम कोर्ट लाइव्ह
सकाळी पावणेबारा वाजता सुनावणी सुरू झाली. सुन्नी वक्फ बोर्डाचे वकील राजीव धवन यांनी सांगितले की, निर्मोही आखाड्याचे वकील सुशील जैन यांच्या आईचे देहावसान झाले असल्याचे ते बुधवारी युक्तिवाद करतील. हिंदू पक्षकारांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ के. पराशरण यांनी युक्तिवाद केला.... वाचा लाइव्ह कार्यवाही...
पराशरण : श्रीराम जन्मभूमीसाठी हिंदूंनी दीर्घकाळ संघर्ष केला आहे. येथे श्रीरामांचा जन्म झाल्याची हिंदूंची श्रद्धा आहे. मात्र, मुस्लिम आज यावर हक्क सांगतात. तुर्क, मोगल, सिकंदरसह अनेकांनी भारतावर आक्रमणे केली. मात्र, आर्य येथे कायम राहिले.
या मुद्द्यावर मुस्लिम पक्षकारांच्या वतीने अॅड. राजीव धवन यांनी तत्काळ आक्षेप घेतला.
पराशरण : आर्य येथील मूळ निवासी होते. रामायणातही सीता पती श्रीरामांना आर्य म्हणत. आर्य आक्रमणकर्ते कसे होऊ शकतात?
अॅड. धवन : जे युक्तिवाद रेकॉर्डला नाहीत ते नाहीत.
पराशरण : बाबरासारख्या परकीय आक्रमकाला हिंदुस्थानचा गौरवपूर्ण इतिहास संपवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही. अयोध्येत राम मंदिर पाडून मशीद उभारणे ही ऐतिहासिक चूक आहे. अयोध्येत ५०-६० मशिदी आहेत. तेथे प्रार्थना करू शकतात. वादग्रस्त वास्तू होती ते मात्र श्रीरामांचे जन्मस्थळ आहे. ते आपण बदलू शकत नाही. अॅड. धवन : अयोध्येत मंदिरेही हजारो आहेत...
सरन्यायाधीश : मिस्टर धवन... सुनावणी गांभीर्याने घ्या...
पराशरण : मशीद कायम मशीदच राहते हे मी मानत नाही. मात्र, मंदिर हे कायम मंदिरच राहते. मूर्ती असो अथवा नसो.
सरन्यायाधीश : मुस्लिम पक्षकारही असेच म्हणतात. दीर्घकाळ ताबा असला म्हणजे मालकी हक्क मिळू शकतो?
पराशरण : संपत्तीची स्पष्ट मालकी असेल तर जेथे पूजा होते त्या ठिकाणी असा दावा केला जाऊ शकतो.
अॅड . धवन : ही पूजा करणाऱ्यांतील लढाई नाही.
पराशरण : न्यायमूर्तींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देणे हे माझे कर्तव्य आहे. दोन्ही पक्षांकडे मालकी हक्काचे पुरावे नाहीत. मात्र, रामजन्मभूमी अतिप्राचीन असल्याने यावर हिंदूंचाच हक्क आहे.
येथे कोणीही चुकीचा दावा करत नाही. मशीद मोकळ्या जागेवर उभी राहिली हे सिद्ध करण्याची जबाबदारी मुस्लिम पक्षकारांची आहे.
हिंदू पक्षकारांच्या वतीने अॅड. सी. एस. वैद्यनाथन यांचा युक्तिवाद
अॅड. धवन : हा युक्तिवाद बंद करा... त्यांना थांबवा.
वैद्यनाथन : बाबराने दिलेले योगदान आणि अनुदान मुस्लिम पक्षकार सिद्ध करू शकले नाहीत.
न्या. बोबडे : योगदान हा केवळ विश्वासाचा विषय आहे. याचे पुरावे असू शकत नाहीत.
वैद्यनाथन : मुस्लिम पक्षकारांनी १८६०च्या दस्तऐवजांचा वापर केला आहे. हा या प्रकरणाशी संबंधित पहिला कायदेशीर दस्तऐवज आहे. मात्र, याचा अनुवाद चुकीचा आहे. यात नवे मुद्दे जोडण्यात आले आहेत. शिवाय वक्फचा उल्लेख आहे. जमिनीवर मालकी सांगताना १८६०च्या दस्तऐवजांचा दाखला देण्यात आला आहे. यावर विचार केला पाहिजे. तो याकरिता की, इंग्रजांनी मशीद बांधणाऱ्या साहब बाकी किंवा मीर रजब अलीपर्यंत कोणाच्याही कौटुंबिक संबंधांचा निर्णय देण्याच्या दृष्टीने विचार केला नव्हता. या जागेची मालकी सांगणारा एकही ठोस पुरावा आज उपलब्ध नाही.

३९ वा दिवस
आज ४०व्या दिवशी सुनावणी पूर्ण करण्याचे पीठाचे संकेत, निकाल राखून ठेवला जाण्याची शक्यता
आज सर्वोच्च न्यायालयात... हिंदू पक्षकारांचे वकील सी. एस. वैद्यनाथन ४५ मिनिटे बाजू मांडतील. त्यानंतर मुस्लिम पक्षकारांच्या वकिलांना एक तास मिळेल. यानंतर पुन्हा ४५-४५ मिनिटांचे ४ टप्पे असतील. यानंतर बुधवारीच सर्वोच्च न्यायालय निकाल राखून ठेवण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...