आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऔरंगाबाद. ना रंगभूषा, ना नेपथ्य, ना प्रकाश योजना. केवळ अभिवाचनातून कथेतील पात्र अगदी डोळ्यासमोर अवतरल्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला. केवळ वाचिक अभिनयातून बब्रुवान रुद्रकंठवार यांच्या कथेतील बबऱ्या, बारक्या, बायली, दोस्त अशी अनेक पात्रे जणू रंगमंचावर वावरत आहेत की काय असे चित्र उभे राहिले. पद्मनाभ पाठक, सुजाता पाठक आणि सतीश जाधव यांनी अभिवाचन करून हा सुंदर अनुभव प्रेक्षकांना दिला.
रविवारी दुपारच्या सत्रात धनंजय चिंचोलीकर ऊर्फ बब्रुवान रुद्रकंठवार यांच्या विविध कथेतील तुकड्यांचे वाचन या कलावंतांनी केले. केवळ शब्द उच्चार, संवादातील चढ-उतार, पात्रांचा बोलण्याचा लहेजा याचा बारकाईने अभ्यास करून रसिकांसमोर सादरीकरण केले. रुद्रकंठवार यांच्या रूपककथेतून आजच्या समाजातील परिस्थितीचे केलेले वर्णन रसिकांना खिळवून ठेवणारे होते. एका तासात पाच कथांमधील तुकड्याचे या वेळी सादरीकरण करण्यात आले. काश्युम अवेरनेस, भूमिका डू आर डाय, जातीचं मॅथेमॅटिक्स, लँडमार्क आणि सेकंड ओपिनियन, पाहुण्यांच्या गणशॉट इमॅजिनेशन या कथांचे सादरीकरण करण्यात आले. पाचही कथेत आजच्या पिढीला आवडेल अशा मराठी, इंग्रजी शब्दांची सरमिसळ तेही अगदी मराठवाडी टोनमध्ये प्रेक्षकांना अगदी जवळची वाटली. स्थानिक कलावंतांनी केलेले हे सादरीकरण ऐकण्यासाठी नाट्यप्रेमींनीदेखील गर्दी केली होती. दिव्य मराठीचे सिटी इन्चार्ज श्रीकांत सराफ यांनी सूत्रसंचालन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.