आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Babul Supriyo, Patanjali Spokesperson SK Tijarawala And 11 Others Mobile Phones Stolen At Arun Jaitley Funeral

अरुण जेटलींच्या अंत्यसंस्कारात बाबुल सुप्रियोसह 11 जणांचे मोबाइल चोरीला; ट्वीट करून दिली माहिती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यावर रविवारी दिल्लीच्या निगमबोध घाटावार अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीला हजर राहणारे भाजपा खासदार बाबुल सुप्रियो आणि पतंजलीचे प्रवक्ता एस.के तिजारावालासह 11 लोकांचे मोबाइल चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. तिजारावाला यांनी सोमवारी ही माहिती दिली. 

बाबुल सुप्रियोसह पाच जणांनी मोबाइल चोरी झाल्याची तक्रार नोंदवली आहे. आम्ही या प्रकरणाचा तपासा सुरु केला असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर तिजारावाला यांनी ट्वीट करत मोबाइलचा फोटो, त्याची लोकेशन आणि आयएमईआय नंबर शेअर केला आहे. 
 

तिजारावाला यांचे ट्वीट

   

माझा फोन देखील मला अंतिम नमस्कार करून केला
पतंजलीचे प्रवक्ते यांनी ट्वीट केले की 'सर्वजण दुखी अंतकरणाने सर्वजण अरुण जेटली यांचे शेवटचे दर्शन घेत होते, तेव्हा हा फोटो ज्या मोबाइलने घेतला तो फोन मला शेवटचा नमस्कार करून गेला. निगमबोध घाटावर माझा, खासदार बाबुल सुप्रियो आणि इतर 9 जणांचा फोन चोरी झाला ही दुःखद बाब आहे.'
 
 
 

बातम्या आणखी आहेत...