आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पणजी पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का, 25 वर्षांपासून ताब्यात असलेली विधानसभा काँग्रेसने केली काबीज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पणजी - गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने पणजी विधानसभेची एक जागा रिक्त झाली होती. या जागेसाठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने विजय प्राप्त केला आहे. काँग्रेसचे बाबुश मोन्सरात यांनी भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा 1758 मतांनी पराभव केला आहे. 

 


25 वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात होती जागा
पणजी मतदारसंघात काँग्रेसचे बाबुश मोन्सरात, भाजपचे सिद्धार्थ कुंकळ्येकर आणि गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर यांच्यात तिहेरी लढत होती. भाजपचा गड समजल्या जाणाऱ्या पणजी विधानसभेवर काँग्रसने मिळवली आहे. गेल्या 25 वर्षांपासून ही जागा भाजपच्या ताब्यात होती.  

 


मनोहर पर्रिकरांच्या मुलाची उमेदवारी नाकारली
भाजपने पणजी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत मनोहर पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी न देता माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांना उमेदवारी दिली होती. बाबूश मोन्सरात यांनी सिद्धार्थ कुंकळ्येकर यांचा 1758 मतांनी पराभव केला. पण इतर तीन जागांवर विजय मिळविण्यात भाजपला यश आले आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...