आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mum Claims Baby Almost Lost Four Toes When Single Strand Of Her Hair Wrapped Cut Off Circulation

सकाळी उठल्यानंतर दूध पीत नव्हते बाळ, जोरजोरात ओरडत होते, आईला आली शंका आणि...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेंगन्टनः इंग्लंडमध्ये राहणारी महिला एका सकाळी झोपेतून उठल्यानंतर तिचे बाळ दुध पित नव्हते आणि सोबतच ते जोरजोरात ओरडत होते. बाळाचे विचित्र वागणे बघून महिलेला संशय आला की, बाळासोबत काहीतरी विचित्र घडले असावे. जेव्हा तिने बाळाला बारकाइने बघितले, तेव्हा बाळाच्या पायाच्या तीन बोटांमध्ये विचित्र पद्धतीने केस गुंडाळले गेले होते. त्याचा त्रास बाळाला होत होता. हैराण करणारी गोष्ट म्हणजे केस अशाकाही प्रकारे बोटांमध्ये गुंतले गेले होते की, त्यामुळे बाळाची तिन्ही बोटे कापण्याची वेळ आली होती.

 

- ही कहाणी इंग्लंडच्या पेंगन्टन शहरात राहणा-या 26 वर्षीय एलेक्स उप्टन आणि तिचा दोन महिन्याचा मुलगा इजराची आहे. एलेक्स टीचिंग असिस्टंट असून बाळाच्या जन्मानंतर सध्या मॅटर्निटी लिव्हवर आहे.

- ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जेव्हा एलेक्स झोपेतून उठली तेव्हा तिचे बाळ जोरजोरात रडत होते. इजराला भूक लागली असावी, असा अंदाज तिने बांधला. जेव्हा तिने तिच्या बाळाला दुध पाजण्याचा प्रयत्न केला तेव्हा बाळ दूध पीत नव्हते.
- त्यानंतर बाळाचे कपडे बदलत असताना त्याच्या पायाच्या बोटांना सूज आल्याचे तिच्या लक्षात आले. एक मोठे केस त्याच्या बोटांमध्ये अडकल्याचे तिने पाहिले.
- केस गेल्या 14 तासांपासून बाळाला त्रास देत होते. एलेक्सच्या लक्षात आले की, यामुळे बाळाला त्रास होतोय. केस बाळाच्या बोटांमधून निघत नव्हते.


एका बोटात अडकून पडले होते केस
- एलेक्सने सांगितल्यानुसार, त्याच्या दोन बोटांमधून केस काढण्यात मला यश आले. पण त्याच्या एका बोटात केस असे काही गुंतले होते, की ते निघणे कठीण झाले होते.
- ती बाळाला डॉक्टरांकडे घेऊन हेली. त्यानंतर डॉक्टरांनी बाळाच्या बोटांवर अँटीबॅक्टिरियल क्रीम लावली. 
- डॉक्टर्सच्या मते, केस जास्त वेळ बाळाच्या बोटात अडकून राहिल्याने त्याला हेअर टर्निकट सिंड्रोम झाला होता. हा आजार नवजात बाळांना होत असतो. 

 

आता इतरांना करत आहे अलर्ट
- एलेक्सने सांगितले की, जर मी योग्य वेळी बाळाकडे लक्ष दिले नसते, तर कदाचित बाळाची तीन बोटे कापावी लागली असती.
- डॉक्टर्स किंवा ज्या महिला आई आहेत, त्यांनी नव्याने आई झालेल्या महिलांना अशाप्रकारच्या आजाराविषयी अलर्ट करायला हवे.
- आता एलेक्स इतर महिला आणि पुरुषांना अलर्ट करुन आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला सांगत आहे. विशेषतः बाळाच्या अंघोळी आणि कपडे बदलण्याच्या वेळी विशेष सावधगिरी बाळगायला हवी. अन्यथा अशा छोट्या छोट्या घटना मोठ्या दुर्घटनांमध्ये बदलू शकतात. 

बातम्या आणखी आहेत...