आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Baby Born The Size Of A Syringe, Doctors Told He Would Not Survive, But Lived Against All Odd

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईने दिला इतक्या छोट्याशा बाळाला जन्म की चक्क खिशातही बसेल! डॉक्टरही हैराण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉटिंघमशायर - इंग्लंडच्या नॉटिंघमशायरमध्ये राहणाऱ्या एका महिलेने अतिशय छोट्या अशा मुलाला जन्म दिला आहे. त्याचा आकार इतका लहान आहे की अगदी एका तळहातावर सुद्धा तो निवांत झोपू शकेल. त्याच्या आकाराची तुलना एका इंजेक्शन सिरींजशी केली जाऊ शकते. या बाळाला पाहून फक्त सामान्य लोकच नव्हे, तर डॉक्टर सुद्धा हैराण आहेत. महिलेने आपल्या गर्भधारणेच्या 26 व्या आठवड्यात या बाळाला जन्म दिला.


हाना रोस (25) आपल्या गर्भधारणेच्या वेळी खूप समस्यांना सामोरे जात होती. डॉक्टरांनी हाना आणि तिच्या पतीला एका आजारामुळे बाळाला वाचवणे कठिण असल्याचे सांगितले. तसेच अशा परिस्थितीमध्ये हानाचे आरोग्य लक्षात घेता गर्भपात करण्याचा सल्ला दिला. परंतु, हाना तयार झालीच नाही. तोपर्यंत गर्भपात करण्याची मर्यादा सुद्धा निघून गेली होती. अशात डॉक्टरांनी 26 व्या आठवड्यात कृत्रिम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर जन्माला आलेल्या मुलाचा आकार पाहून सर्वांनाच धक्का बसला. तो रुग्णालयातील एखाद्या सिरींजच्या आकाराचा होता. बाळ इतके लहान होते, की त्याला कडेवर नाही तर फक्त तळहातावर घ्यावे लागत आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, गर्भधारणा झालेली असताना तिला सेपसिस आणि मॅनिनजायटिस नावाचे आजार होते. अशात मुलाच्या जीवंत राहण्याची शक्यता खूपच कमी होती.

 

हाना सांगते, "डॉक्टर मला आणि माझ्या पतीला वारंवार हेच सांगत होते, की तुमचे बाळ वाचणार नाही. अशात डिलिव्हरी झाल्यानंतर त्याचा आकार आणि एकूण त्याची अवस्था पाहून आम्हाला देखील मोठा शॉक बसला. त्याचा आकार इतका लहान होता की किचनमध्ये ठेवलेल्या एखाद्या मसाल्याच्या डबीसोबत त्याची तुलना होऊ शकेल. तरीही मला आतून विश्वास होता की हा जीवंत राहील." यानंतर डॉक्टरांनी त्या बाळाला अतिदक्षता विभागात ठेवून त्याची काळजी घेतली. त्याच्या जीवंत राहण्याची शक्यता 10 लाखांपैकी एक होती. त्यामुळे, डॉक्टरांनी सुद्धा हा एक चमत्कारच असल्याचे म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...