आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोमरसेट- इंग्लंडमध्ये राहणाऱ्या एका दाम्पत्याच्या मुलाला एक अतिशय दुर्मिळ आजार झाला आहे. एड (वय42) आणि त्याची पत्नी जेमा(वय32) असे या दाम्पत्याचे नाव असुन त्यांचा दोन वर्षांचा मुलगा दिवसभर हसत होता. जॅक असे या मुलाचे नाव असुन त्याच्या स्वभावामुळे तो हसत असल्याचे दाम्पत्याला वाटले. परंतु एके दिवशी जॅक जवळपास 17 तास हसत राहील्याने या दाम्पत्याला आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर त्यांनी जॅकला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर समोर आले हे सत्य...
> डॉक्टरांनी जॅकचे सीटी स्कॅन केल्यानंतर समोर आले की जॅकच्या हासण्याचे कारण त्याच्या डोक्याला झालेला ब्रेन ट्युमर आहे. जॅकला Epileptic Seizures म्हणजेच हास्याचे झटके येत असल्याने तो हसत होता. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, जॅकला झालेल्या ट्युमरवर तात्काळ उपचार न झाल्यास कधीही त्याचा मृत्यू झाला असता.
10 तास सुरू होते ऑपरेशन
> जॅकला झालेला ट्युमर हा प्राथमिक स्तरावर होता. डॉक्टरांनी जवळपास 10 तास सर्जरी करुन त्याचा ट्युमर बाहेर काढला. त्यानंतर लगेच जॅकचे हास्याचे झटके बंद झाले.
हजार मुलांमध्ये एका मुलाला होतो हा आजार
> डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, हजारांमध्ये एका मुलाला हा दुर्मिळ आजार होतो. यामुळे संपुर्ण शरीरात अचानक ऊर्जेचा स्त्राव सुरू होतो आणि ही ऊर्जा हास्य किंवा रडण्याच्या स्वरुपात बाहेर पडते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.