Local News / मुंबई / डोंबिवली स्टेशनवर पार पडली महिलेची डिलिव्हरी, डॉक्टरांनी फी म्हणून घेतला फक्त 1 रुपया

एका रुपयात स्टेशनवर केली सुखरूप डिलिव्हरी, जाणून घ्या या डॉक्टरांबद्दल...

वृत्तसंस्था

Jul 03,2019 11:24:04 AM IST

मुंबई - येथील डोंबिवली लोकल स्टेशनवर एका गर्भवती महिलेची बुधवारी सुखरूप डिलिव्हरी करण्यात आली आहे. प्रसव वेदनेने त्रस्त 29 वर्षीय महिलेला कामा रुग्णालयात नेले जात होती. परंतु, पाऊस, पूर आणि गर्दीमुळे डोंबिवली प्लॅटफॉर्मवरच महिलेला कळ बसली. त्यातही सुदैवाने एक रुपया क्लिनिक नावाने प्रसिद्ध असलेले डॉक्टर आणि नर्स स्टेशनवरच उपस्थित होते. त्यांनी या महिलेची सुखरूप डिलिव्हरी केली आहे. या महिलेने एका मुलाला जन्म दिला. अगदी वेळेवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांनी आपल्या रुग्णाकडून फी म्हणून एक रुपया घेतला आहे. या महिलेवर डॉ. स्मिता उप्पड (स्त्रीरोगतज्ज्ञ) आणि त्यांच्या टीमने उपचार केले.


दोन वर्षांपूर्वी अशी झाली 1 रुपया क्लिनिकची सुरुवात
डॉ. राहुल घुले हे 2014 मध्ये कुलाबात अशाच प्रकारे क्लिनिक चालवत होते. दरम्यान, त्यांच्या आई-वडिलांना अपघात होऊन त्यात आईच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्या वेळी उपचारासाठी एका रात्रीत बीड आणि पुणे अशा दोन ठिकाणी नेण्यात आले. मेंदूतून रक्तस्राव झाल्याने त्यांना सहा महिने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. आईची प्रकृती सुधारली तरी अर्धांगवायूमुळे त्या हालचाल करू शकत नव्हत्या. डॉक्टर असतानाही रुग्णाच्या नातेवाइकाच्या भूमिकेतील अनुभवावरून रुग्णांना स्वस्त आणि वेळेवर उपचार किती गरजेचे आहे हे डॉ. घुले यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी तीन ते चार वर्षे यावर अभ्यास केला. या अभ्यासातूनच या क्लिनिकची संकल्पना अखेर मूर्त स्वरूपात उतरली.


पाच डॉक्टरांचा चमू
डॉ. राहुल घुले यांच्याबरोबर त्यांचे बंधु डॉ. अमोल घुले (एमडी), डॉ. स्मिता उप्पड (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. अतुल गिरी (त्वचातज्ज्ञ), डॉ. अभय मुंडे (नेत्ररोगतज्ज्ञ) अशा एमबीबीएस आणि एमडी डॉक्टरांचे पथक या क्लिनिकमध्ये सेवा उपलब्ध करून देतात.

X
COMMENT