राहुरी / बुडणाऱ्या मुलाला वाचवताना आईसह मुलाचा बुडून मृत्यू

बुडणाऱ्या पतीला तिने वाचवले, पण मुलासह तिचा बुडून मृत्यू झाला

वृत्तसंस्था

Sep 16,2019 07:53:00 AM IST

राहुरी शहर - बुडणाऱ्या पतीला तिने वाचवले, पण मुलासह तिचा बुडून मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी सायंकाळी मुळा धरणावरील चमोरी गेस्टहाऊससमोर घडली. नगर शहरातील बोरूडे मळा येथील सातपुते कुटुंब शेजारच्या कुटुंबाबरोबर मुळा धरण पाहण्यासाठी रविवारी गेले होते. गणेश सातपुते (४३), पूजा गणेश सातपुते (३७) व मुलगा ओंकार (१३) चमोरी गेस्टहाऊससमोर जलाशयाजवळ उभे होते. अचानक ओंकारचा पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. मुलगा पडल्याचे दिसताच गणेश यांनी पाण्यात उडी टाकली. मात्र, या बाप-लेकाला पोहता येत नसल्याने दोघेही बुडू लागले.


पती व मुलगा बुडत असल्याचे पाहून क्षणाचाही विलंब न करता पूजा यांनी धाडसाने पुढे जात पतीला हात दिला. त्यामुळे त्यांचा प्राण वाचला. पण मुलगा ओंकारला वाचवण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. पाण्याची खोली जास्त असल्याने मायलेक बुडाले.

X
COMMENT