आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कपड्यात गुंडाळून ठेवलेले 'स्त्री' जातीचे जिवंत अर्भक आढळले, पोलिसांकडून मातेचा शोध सुरू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : जालना शहरातील चंदनझिरा भागातील लहूजीनगर परिसरात कपड्याच्या गाठाेड्यात गुंडाळून ठेवलेले स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडल्याची घटना सोमवारी घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. हे अर्भक कुणी ठेवले याच्या तपासासाठी पोलिसांची धावपळ सुरू झाली. परिसरात कुठे सीसीटीव्ही आहे का, मेन रोडहून कुणी आले का, याबाबतचा तपास केला जात असून 'नकोशी'च्या मातेचा पाेलिस शोध घेत आहेत.

या घटनेप्रकरणी चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका बंद पडलेल्या हॉटेलच्या परिसरात हे जीवंत अर्भक आढळले आहे. या अर्भकावर महिला बाल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्त्री अर्भक असल्याने मुलगी नको म्हणून टाकून देण्यात आले असावे. हे बाळ अनैतिक संबंधातून जन्मले असावे या दिशेने तपास सुरू आहे. दरम्यान, या जीवंत अर्भकावर महिला व बाल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अर्भकाच्या मातेचा शाेध घेण्यासाठी चंदनझिरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक कोठाळे, प्रमोद बोंडले यांच्यासह अनिल काळे आदी तपास करत अाहेत.
 

बातम्या आणखी आहेत...