आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Nashik : मच्छरदाणीत 2 बालकांसोबत झोपला बिबट्याचा बछडा, तासभर कोणाला कळलेही नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - धामणगाव येथे बर्डे या आदिवासी कुटुंबाच्‍या घरात मंगळवारी पहाटे 4 वाजेच्‍या सुमारास बिबट्याचा बछडा घरात घुसला. घरातील कोणालाच याचा सुगावा लागला नाही. हा बछडा नंतर घरातील 2 मुलांच्‍या पांघरूणात अलगद शिरला व झोपी गेला. नंतर आईने पांघरुणाकडे लक्ष दिले असता तिला बछडा मुलांसोबत झोपी गेलेला दिसला. हे दृश्‍य पाहून तिची चांगलीच भंबेरी उडाली.      

 

इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे मनीषा बर्डे या पती आणि दोन मुलांसोबत भरवस्तीत राहतात. मंगळवारी पहाटे 4 वाजेच्या सुमारास प्रात:विधीसाठी दरवाजा उघडल्यानंतर बाहेर असलेला बिबट्याचा ३ महिन्यांचा बछडा घरात घुसला. याबाबत त्यांना समजलेच नाही. घरात बर्डे यांचे २ मुले मच्छरदाणी पांघरून झोपलेले होते. त्या बछड्याने मुलांच्या बिछान्यात अलगद प्रवेश केला व झोपी गेला.

 

पहाटे ५ वाजता मनीषा बर्डे यांच्या लक्षात या आगंतुक पाहुण्याची चाहूल लागल्याने त्यांची भंबेरी उडाली. त्यांनी तात्काळ गावकऱ्यांच्या मदतीने वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांना संपर्क करून याबाबत माहिती दिली. त्‍यानंतर इगतपुरीचे वन परिक्षेत्रअधिकारी आर.पी. ढोमसे यांच्‍या मार्गदर्शनाखाली वन परिमंडळ अधिकारी गोरक्षनाथ जाधव,  वनरक्षक रेश्मा पाठक, संतोष बोडके, बबलू दिवे, भोराबाई खाडे, फैजअली सय्यद, दशरथ निरगुडे, श्रावण निरगुडे, रामदास बगड, मुरलीधर निरगुडे यांनी जाळ्यांच्या साहाय्याने बिबट्याच्या पिल्लाला ताब्यात घेतले.

 

बातम्या आणखी आहेत...