आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Baby Sex Determination Test From Astrologers, Interesting Courses Are Taught In Different Universities Across The Country

ज्योतिषाकडून गर्भलिंग चाचणी, देशभरातील वेगवेगळ्या विद्यापीठात शिकवले जातात मनोरंजक अभ्यासक्रम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमित मुखर्जी/वाराणसी : काशी हिंदू विद्यापीठामध्ये १३ जानेवारीनंतर आयुर्वेद विभागात भूत विज्ञानाशी संबंधित एक नवीन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू होणार आहे. अभ्यासक्रमाला विद्यापीठाच्या शिक्षण परिषदेने मान्यता दिल्याचे विभागप्रमुख यामिनी भूषण यांनी सांगितले. अभ्यासक्रमाचा अवधी ६ महिन्यांचा असणार आहे, तर शुल्क ५० हजार असेल. यात शरीरशास्त्र, मानसशास्त्र, शरीर विज्ञान व औषधशास्त्र हे विषय शिकवले जातील. मानसिक आजार भूतबाधेमुळे होतात ही अंधश्रद्धा दूर करणे हा अभ्यासक्रमामागील मुख्य हेतू असल्याचे सांगण्यात येते.

कुंडली बघून करतात आजाराचे निदान

प्रदीप बौहरे/ग्वाल्हेर : मध्य प्रदेशातील जीवाजी विद्यापीठात एमए ज्योतिषशास्त्र शिकवले जाते. दोन वर्षांची पदव्युत्तर पदवी चार सत्रात पूर्ण केली जाते. ज्योतिषीय गणनेद्वारे गर्भात मुलगी की मुलगा, याची चाचणी करणे शिकवले जाते. कुंडली बघून कोणता आजार होऊ शकतो हे सांगितले जाते.

दिले जाते भाषणाचे प्रशिक्षण

ननू जोगिंदर सिंग/पंजाब : विद्यापीठाने ३ वर्षांपूर्वी एमए गव्हर्नन्स अँड लीडरशीप अभ्यासक्रमाला सुरुवात केली. यात १५ जागा आहेत.प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील असून निवडणूक प्रक्रिया, मोहीम राबवणे व भाषण देण्याचे प्रशिक्षण देण्यात येते.

मंत्रोच्चाराने आजार दूर करण्याचे शिक्षण

हर्ष खटाना/जयपूर : जगद्गुरू रामानंदाचार्य राजस्थान संस्कृत विद्यापीठात मंत्रांद्वारे आजार दूर करण्याचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. विद्यापीठातील राजस्थान मंत्र प्रतिष्ठान या विभागांतर्गत अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरू झाले आहेत.

गर्भसंस्काराचा अभ्यासक्रम

गिरीश उपाध्याय. मध्य प्रदेशातील अटल बिहारी वाजपेयी हिंदी विद्यापीठाने ऑक्टोबर २०१४ मध्ये गर्भ संस्कार तपोवन केंद्र सुरू केले होते. गरोदर महिलांना हिंदू संस्कार व गर्भ संवादाद्वारे निरोगी व बुद्धिमान बालक जन्माला घालण्यास मदत होईल.

बातम्या आणखी आहेत...