आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन महिन्यांच्या बाळाला घेऊन फिरायला गेली आया, तिचा BF देखिल होता बरोबर, काही तासांनी झोपलेले बाळ आईकडे दिले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉसॉ - अमेरिकेच्या विस्कोसिनमध्ये राहणाऱ्या एका प्रेग्नंट महिलेवर दोन महिन्यांच्या बाळाच्या हत्येचा आरोप लागला आहे. या महिलेने केवळ बाळाच्या मृत्यूचे सत्य त्याच्या आईपासून लपवलेच नाही तर नवजात बाळाची डेडबॉडी घेऊन बॉयफ्रेंडबरोबर फिरायलाही गेली होती. बाळाला आईकडे देत ती फक्त तो झोपला आहे एवढेच बोलली. अनेक तासांनीही बाळ उटले नाही, तेव्हा महिलेला बाळाच्या मृत्यूबाबत समजले. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये बाळाच्या शरीरावर अनेक जखमा आढळल्या. त्यामुळेच बाळाचा मृत्यू झाला होता. 

 

झोपेतून उठलेच नाही बाळ 
- अमेरिकेच्या वॉसॉ शहरातील मारिसा टीटसोर्ट (28) नावाची महिला आया म्हणून काम करते. तिची स्वतःची पाच मुले आहेत आणि ती सहाव्यांदा प्रेग्नंट होती. 
- नुकतेच मारिसावर दोन महिन्याच्या एका बाळाची हत्या केल्याचा आरोप लागला. ती बाळाला सांभाळण्याचे काम करत होती. बाळ बराचवेळ झोपलेलेच होते, त्यावेळी आईला याबाबत समजले. 
- पोलिसांच्या मते, 18 ऑक्टोबरच्या दुपारी बाळाची आई तिच्या दोन्ही मुलांना आया मारिसाकडे सोडून गेली होती. काही तासांनी जेव्हा महिला मुलांना घेण्यासाठी मारिसाकडे गेली तेव्हा तिने लहान बाळ झोपलेले असल्याचे सांगितले. त्यानंतर महिला दोघांना घेऊन घरी आली. 
- रात्री जवळपास 9 वाजेपर्यंत बाळ झोपून उठले नाही तर त्याच्या आईने पाहिले की, त्याचा श्वासोच्छ्वास बंद आहे. तसेच त्याचे शरीरही अखडले होते. ओठ निळे झाले होते. महिलेने त्यानंतर मारिसाबाबत पोलिसांत तक्रार केली होती. 


 

बातम्या आणखी आहेत...