आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नंसी टेस्टसाठी गेलेल्या महिलेला नर्सने दिली गुड न्यूज, बाळाचा जन्म झाला तर सर्वच हैराण, डॉक्टरांना आनंद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मर्सिसाइड - इंग्लंडमध्ये एका बाळाचा जन्म झाल्यापासूनच ते सेलिब्रिटी बनले आहे. या बाळाचे वैशिष्ट्य म्हणदे त्या बाळाचे केस. इतर मुलांच्या तुलनेत या बाळाला खूप केस आहेत. आधी या केसांमुळेच हॉस्पिटल स्टाफला मुलगी झाली असे वाटले. पण तो मुलगा होता. सध्या हा मुलगा 5 महिन्यांचा झाला आहे. लांब केसांमुळे त्याला एखाद्या सेलिब्रिटीसारखी वागणूक मिळते. 


नर्स समजली मुलगी 
- मर्सिसाइडमधील रशेल (30) आणि गॅरेथ कार्टर यांचा मुलगा बॉबी कार्टर यांची ही स्टोरी आहे. त्याचा जन्म 2017 मध्ये झाला होता. 
- बॉबी जेव्हा रस्त्यावर निघतो तेव्हा त्याच्या मोठ्या आणि घनदाट केसांमुळे पाहणाऱ्यांची गर्दी होते. अनेक लोक तर त्याला मुलगी समजतात. 
- रशेल सांगते की, लांब केसांमुले लोक बॉबीची तुलना X-मेन चित्रपटाच्या वॉल्वरिनशी करतात. 
- बॉबीच्या जन्माच्या पूर्वी रशेल जेव्हा जेंडर टेस्ट करण्यासाठी गेली तेव्हा तिला सांगण्यात आले होते की, ती एका मुलीची आई बनणार आहे. गर्भावस्थेतील केसांमुळे नर्सला गैरसमज झाला होता. 
- आईच्या मते, जेव्हा बाळाचा जन्म झाला, तेव्हा बाळ सेलिब्रिटी बनले होते. डॉक्टर्स आसपासच्या लोकांना फोन करून बाळाला पाहण्यासाठी बोलावत होते. तर बॉर्डमधीलही प्रत्येकजण बाळाला घेऊ इच्छित होता. 


केसांचा रंग वडिलांच्या केसांप्रमाणेच 
- रशेलचे म्हणणे आहे की, ती जेव्हाही त्याला घेऊन बाहेर निघते तेव्हा लोक त्याला पाहण्यासाठी थांबतात. एका महिलेने तर रस्त्यात कार थांबवत त्याच्या केसांचे कौतुक केले होते. 
- रशेलचा जन्म झाला तेव्हा तिलाही खूप केस होते, असे तिची आई सांगते. 

बातम्या आणखी आहेत...