आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिमुरड्याला एकटे सोडून बाहेर गेली आया, परतल्यावर ऐकू आले विचित्र आवाज, मग जे घडले त्याने सर्वच झाले चकित

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया - ही कहाणी एका बेबीसीटरच्या बहादुरीची आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात एका दांपत्याने आपल्या मुलाच्या देखभालीसाठी एक आया ठेवली होती. ती मुलाची खूप चांगली काळजी घ्यायची. एका दिवशी ती मुलाला घरात सोडून काही कामानिमित्त घराबाहेर गेली, परंतु परतल्यावर घरात काहीतरी गडबड असल्याचा संशय तिला आला. जराही उशीर न करता ती घरात गेली आणि मुलाला आपल्या कडेवर घेऊन शेजारच्या घरात धाव घेतली. मुलाचे पालक जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना घरात चोरी झाल्याचे कळले आणि आयाच्या समजूतदारपणाचा पुरावा मिळाला.

 
मुलाला घ्यायला घरात गेली आया
- ही घटना कॅलिफोर्नियामधील आहे. येथ एक फुलटाइम वर्किंग कपलने आपला मुलगा जोशसाठी एक आया ठेवली. ती मुलाला खाऊ घालण्यापासून ते अंघोळीपर्यंत सर्व कामे करायची.

- एका दिवशी मुलाला घरात सोडून आया बाहेर त्याच्यासाठी फळे घेण्यासाठी गेली. ती घरी परतल्यावर तिला काहीतरी गडबड असल्याचा संशय आला.
- घराच्या दारापर्यंत पोहोचताच तिला आतून चित्रविचित्र आवाज येऊ लागले. तिचा संशय खरा ठरला. तथापि, यानंतरही तिने परत जाण्याचा विचार केला नाही.
- आयाने लगेच घराचा मुख्य दरवाजा उघडला आणि जोशचा शोध सुरू केला. जेणेकरून तिला येथून सुरक्षितरीत्या निघता येईल. जोश खेळण्याच्या मूडमध्ये होता आणि आपल्या लाकडी ट्रेनकडे सरकत होता.

 
मुला घेऊन घरातून पळून गेली
- खेळण्यांकडे जाताना आयाला बाळ दिसले. तिने ताबडतोब कडेवर घेतले. तिला बाळाच्या सुरक्षिततेची काळजी होती. यामुळे बाळाला घेऊन धावत-धावत थेट शेजाऱ्यांच्या घरात शिरली. 
- ती घाईगडबडीत दार उघडण्याऐवजी फेन्सिंगवरूनच उडी मारून शेजाऱ्याच्या कॅम्पसमध्ये पोहोचली आणि डोअरबेल वाजवली. योगायोगाने शेजारी घरातच होते. ते मदतीसाठी बाहेर आले.
- यानंतर त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तथापि, पोलिस पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत चोर दार उघडे पाहून घरातून पसार झाले होते.

 

फुटेजमधून समोर आले धाडस
- जोशचे पालक जेव्हा घरी पोहोचले तेव्हा ही घटना कळल्यावर त्यांना धक्काच बसला. परंतु जेव्हा त्यांनी सीसीटीव्ही फुटेज पाहिले तेव्हा त्यांनी आयाचा समजूतदारपणा आणि प्रामाणिकपणाचे कौतुक केले.
- जोशचे आईवडील म्हणाले की, आयाने जर फक्त स्वत:पुरता विचार केला असता, तर ती बाहेरूनच परतू शकली असती, परंतु आपली परवा न करता तिने बाळाला सुरक्षित केले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या घटनेचा Video व Photos.. 

 

बातम्या आणखी आहेत...