Home | International | Other Country | Babysitter shuts toddler inside washing machine while laughing Shocking Video

2 वर्षांच्या मुलाला दुसऱ्याला सांभाळायला देऊन कामावर गेली आई, नराधमाने क्रौर्याची हद्द केली पार

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 22, 2018, 02:52 PM IST

पोलंडमध्ये 2 वर्षीय चिमुकल्याविरुद्ध क्रौर्याचा भयचकित करणारा व्हिडिओ समोर आला आहे.

 • Babysitter shuts toddler inside washing machine while laughing Shocking Video

  रॅडम - पोलंडमध्ये 2 वर्षीय चिमुकल्याविरुद्ध क्रौर्याचा भयचकित करणारा व्हिडिओ समोर आला आहे. येथे एक महिला आपल्या बाळाला एका जवळच्या व्यक्तीच्या भरवशावर दिवसभर सोडून कामावर गेली. यानंतर त्या व्यक्तीने बाळाला वॉशिंग मशीनमध्ये टाकून बंद केले आणि त्याचा व्हिडिओ शूट केला. मग बाळ वॉशिंग मशीनमध्ये तडफडत असल्याचा व्हिडिओ ऑनलाइन पोस्ट केला. पोलिसांनी बाळाला बळजबरी सिगारेट पाजल्याचा फोटोही आढळला आहे.


  आईच्या सोशल मीडिया पेजवर दिसला व्हिडिओ
  - पोलिसांना रॅडमच्या रहिवासी 21 वर्षीय जेनेटा डी. हिच्या सोशल मीडिया पेजवरून 2 वर्षीय मुलाचा सिगारेट ओढतानाचा फोटो आणि वॉशिंग मशीनमध्ये त्याला टाकतानाचा व्हिडिओ मिळाला.
  - पोलिसांची तपास केल्यावर कळले की, जेनेटा मुलाची आई आहे आणि मुलाचे नाव कॅस्पर असे आहे. तथापि, आईला या पोस्टबाबत काहीही माहिती नव्हते.
  - तिने सांगितले की, ती तिचा मुलगा कॅस्परला अॅडम बी. नावाच्या एका मित्राकडे सोडून कामावर गेली होती आणि आपला फोनही तिने तिथेच ठेवला होता.


  कुटुंबाच्या परिचयातील व्यक्तीनेच केले क्रौर्य
  - यानंतर कळले की, महिलेने ज्या मित्राच्या भरवशावर बाळाला सोडले होते. त्यानेच बाळाला बळजबरी वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्याच्यासोबत क्रौर्य केले.
  - पोलिसांना असेही कळले की, या व्हिडिओला मॅथ्यूज नावाच्या मुलाने ऑनलाइन पोस्ट केले, जो बेबीसीटर अॅडमचा मित्र होता. तथापि, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.
  - पोलिसांनी याप्रकरणी मुलाच्या वडिलांशीही संपर्क साधला. पोलिसांचे म्हणणे आहे की, चिमुरड्यासोबत झालेला दुर्व्यवहाराला बापच जबाबदार आहे. त्याने बाळाची व्यवस्थित देखभाल केली नाही.
  - तथापि, पोलिसांनी व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या मॅथ्यूजला तो किशोरवयीन असल्याने सोडून दिले. परंतु बेबीसिटर अॅडम आणि मुलाचे वडील तोमाज यांना चाइल्ड अॅब्यूजच्या आरोपांचा सामना करावा लागणार आहे.

  पुढच्या स्लाइडवर पाहा, या धक्कादायक घटनेचा Video व Photos...

 • Babysitter shuts toddler inside washing machine while laughing Shocking Video
 • Babysitter shuts toddler inside washing machine while laughing Shocking Video

Trending