आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे सहा प्रभावी उपाय केल्यास कंबरदुखीपासून मिळेल आराम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या कंबरेच्या दुखण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. व्यक्ती स्त्री असो की पुरुष, तरुण असो की वृद्ध, त्रास मात्र कंबरेच्या दुखण्याचा. मग कधी कोणते तरी तेल चोळ, कधी कशाने तरी शेक घे, कोणत्याही गोळ्या घे असे नाना प्रकार वैद्याच्या सल्ल्याशिवाय चाललेले असतात. त्यामध्ये अपयश आले की मग वैद्याकडे जाऊन आपली तब्येत दाखवायची, अशी सर्वसाधारण पद्धत आढळते. तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. काही घरगुती उपायांचा अवलंब केल्यास हा त्रास दूर केला जाऊ सकतो. 


01. हलक्या गरम पाण्यात नीलगिरी (यूकेलिप्टस) तेलाचे काही थेंब मिसळून अंघोळ केल्याने आराम मिळतो. 


02. गरम दुधात हळद आणि मध मिसळून प्या. यामुळे कंबरदुखीसह सर्दी-खोकल्यातही आराम मिळतो. 


03. खोबरेल तेलात थोडे कापूर मिसळून ते सुमारे पाच मिनिटे उकळून घ्या. ते कोमट करून त्याने मालिश करा.

 
04. अंघोळ करण्याच्या अर्ध्या तासापूर्वी मोहरीच्या तेलाने कमरेची मालीश केल्याने आराम मिळतो. 


05. कोमट पाण्यात काळे मीठ टाकून अंघोळ करा. यामुळे कमरेचा क्रॅम्प दूर होतो आणि वेदनेपासून आराम मिळतो. 


06. तव्यावर ओवा हलका भाजून चावून खा. यामुळेदेखील कंबरदुखी बरी होते. तसेच पोटही दुखत नाही. 

बातम्या आणखी आहेत...