Home | National | Delhi | Back to Congress to lead: the mistake of dying?

आघाडी करण्यात काँग्रेस मागे : धाेरण की चूक? निवडणुकीपूर्वी सर्व विराेधक एकत्र हाेते, आता विखुरलेले

भास्कर रिसर्च | Update - Apr 14, 2019, 10:31 AM IST

 • Back to Congress to lead: the mistake of dying?

  भास्कर रिसर्च - लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मतदान झाले अाहे. मागील वर्षभरापासून काँग्रेस नरेंद्र माेदी यांच्यावर टीका करत हाेती. तसेच त्यांच्याविराेधात अाघाडी करण्यासाठी प्रयत्न करत हाेती.
  परंतु जेव्हा प्रत्यक्षात अाघाडी करण्याची वेळ अाली तेव्हा काँग्रेस मागे राहिली. अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसपासून लांब राहिले, तर अनेक पक्षांनी अाघाडी करण्यास नकार दिला.

  दुसरीकडे भाजपची परिस्थिती चांगली असताना मित्रपक्ष जाेडताना मागील निवडणुकीत पक्षांने जिंकलेल्या जागाही साेडल्या. एका जागेवरही त्यांना एखाद्या पक्षाचा प्रभाव दिसला तर त्याच्याशी युती करण्यासही भाजप तयार झाला.

  > सहा राज्यांत काँग्रेसचा अाघाडीचा प्रयत्न अयशस्वी ठरला. विद्यमान परिस्थिती पाहिल्यास फक्त पाच राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशात काँग्रेस आघाडी करून निवडणूक लढवत आहे.

  > विशेषज्ञ म्हणतात, काँग्रेसने अाघाडीसाठी तयारी केलीच नाही. तीन राज्यांत मिळालेल्या विजयामुळे काँग्रेसला देशभरात आपल्या बाजूने अनुकूल वातावरण वाटत आहे.

  जेथे आघाडी झाली नाही

  दिल्ली | ‘आप’चा हाेता आग्रह, काँग्रेसकडून नकार
  > आपकडून सतत अाघाडी करण्यासाठी प्रयत्न हाेत हाेते. परंतु काँग्रेसने नकार दिला. पंजाब व हरियाणात दाेन्ही पक्षांनी आघाडी करावी, असे केजरीवाल म्हणत हाेते.

  उत्तर प्रदेश | सप आणि बसपने काँग्रेसला आघाडीत घेतले नाही
  > सप-बसपने काँग्रेसला महत्त्व न देता रालोदला साेबत घेत महाअाघाडी केली. काँग्रेस 2022 विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात पूर्ण ताकद लावणार असल्याचे सांगितले जात आहे.

  आंध्र-तेलंगण | टीडीपीशी आघाडी करण्यात अपयश
  > आंध्र व तेलंगणात काँग्रेसला टीडीपीशी आघाडी करण्यात काँग्रेसला यश आले नाही. तेलंगणातील विधानसभा निवडणुकीत दाेन्ही पक्ष एकत्र हाेते.़

  आसाम | एआययूडीएफनेही काँग्रेसला साेबत घेतले नाही
  > एआययूडीएफ प्रमुख बद्रुद्दीन अजमलने काँग्रेसशी आघाडी करण्यास नकार देत स्वबळावर निवडणूक लढवली. अजमल 14 पैकी सात जागा मागत हाेती, काँग्रेस फक्त चार जागा देत हाेती.

  पश्चिम बंगाल | डावेही साेबत अाले नाही
  > पश्चिम बंगालमध्येही डाव्या पक्षांनी काँग्रेससाेबत आघाडी केली नाही. राहुलच्या व्यासपीठावर ममता दिसत हाेत्या. परंतु निवडणुकीत एकत्र आल्या नाहीत.

  येथे झाली आघाडी

  तामिळनाडू | द्रमुकची साथ
  तामिळनाडू व पुद्दुचेरीत काँग्रेसची द्रमुकशी आघाडी झाली. काँग्रेस तामिळनाडूतील 37 मधून नऊ व पुद्दुचेरीच्या एकमेव जागेवर लढत आहे.

  बिहार-झारखंड | राजद आला साेबत
  बिहारमध्ये काॅंग्रेस व राजद एकत्र आले. येथे काॅंग्रेस 40 पैकी फक्त 9 जागांवर निवडणूक लढत आहे. झारखंडमध्ये काॅंग्रेस 14 पैकी सात जागांवर लढणार आहे.

  कर्नाटक | जेडीएसशी झाली अाघाडी
  कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसने मिळून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. काॅंग्रेस 20 व जेडीएस आठ जागांवर लढत आहे.

  महाराष्ट्र | एनसीपीशी समझाेता
  दाेन्ही पक्ष एकत्र आले. काॅंग्रेस यंदा 26 जागांवर तर एनसीपी 22 जागांवर लढत आहे.

  > काँग्रेस आघाडी करण्यात इच्छुक हाेती. परंतु तीन राज्यांतील निवडणुकीमुळे कांॅग्रेस नेतृत्वाची महत्त्वाकांक्षा जागृत झाली. यामुळे तीन राज्यात कांॅग्रेसने बहुजन समाजवादी पक्षाला साेबत न घेता स्बळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
  -राजदीप सरदेसाई, वरिष्ठ पत्रकार

  > काँग्रेसकडे आघाडीसाठी रोडमॅप तयार नव्हता. नेतृत्वही कमकुवत दिसून येत हाेते. ममता... राहुलचेे नेतृत्व आपल्यापेक्षा कमकुवत समजत राहिली. यूपीत आघाडीचा आधार काँग्रेसला माहीत नव्हता.
  -संजय सिंह, विश्लेषक, सीएसडीएस

Trending