आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Dissolving Picture Of A Moving Assembly; Backward MLAs Also Ask For Question In The Legislature!

मावळत्या विधानसभेतील विदारक चित्र; मागास जिल्ह्यांचे आमदार विधिमंडळात प्रश्न विचारण्याबाबतीतही मागेच!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - विदर्भ व मराठवाड्याच्या ९ जिल्ह्यांतील ४० आमदार अधिवेशनात प्रश्न उपस्थित करण्याबाबत मौन धारण करून होते. मुंबई- ठाणे या विकसित जिल्ह्यांतील आमदारांनी सर्वाधिक प्रश्न उपस्थित केले. राज्य विधिमंडळाच्या कामातील (२०१४-१८) अभ्यासातून 'संपर्क' या संस्थेने याबाबत माहिती दिली आहे. २०१४ पासून झालेल्या विधानसभा अधिवेशनांत एकूण ९,८३५ प्रश्न विचारले गेले. मानव विकास निर्देशांकात पिछाडीवरील नंदूरबार, गडचिरोली, वाशिम, हिंगोली, उस्मानाबाद, नांदेड, लातूर, जालना, धुळे या ९ जिल्ह्यांतील ४० आमदारांनी ५ वर्षांत केवळ १,१२३ प्रश्न उपस्थित केले. त्या उलट मुंबई शहर, उपनगर व ठाणे या प्रगत तीन जिल्ह्यांतील आमदारांनी तब्बल २ हजार १३७ प्रश्न उपस्थित केले होते. मागास व आदिवासीबहुल नंदुरबार जिल्ह्यातून ५ वर्षांत केवळ एकच प्रश्न विचारला गेला. मुंबई उपनगर या एका जिल्ह्यातून सर्वाधिक १ हजार ३ प्रश्न मांडले गेले होते.
 

दिलीप सोपल, विजयकुमार गावित यांची चुप्पी
१. राज्यात २८८ पैकी राधाकृष्ण विखे पाटील आणि विजय वडेट्टीवार या आमदारांची प्रश्न संख्या २०० हून जास्त आहे.
२. दिलीप सोपल, शिवेंद्रसिंग भोसले, राम कदम, उदय सामंत, के.सी. पडावी, उदयसिंग पाडवी, विजयकुमार गावित आणि काशीराम पावरा या ८ आमदारांच्या नावावर एकही प्रश्न नाही.
३. आरोग्य, शिक्षण, शेती, पाणी, बालक या पाच विषयांवर सर्वाधिक प्रश्न काँग्रेसच्या आमदारांनी विचारले आहेत.
४. कुपोषण, बेरोजगारी आणि धोरणविषयक या मुद्द्यांवर सर्वाधिक प्रश्न भाजपकडून विचारण्यात आले होते.
५. शेतकरी कामगार पक्ष, बहुजन विकास आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, समाजवादी पार्टी, मनसे, भारिप बम, मार्क्सवादी कम्युनिस्ट या पक्षांनी महिलाविषयक एकही प्रश्न मांडला नाही.
६. शेकाप, रासप, एमआयएम, भारिप बम, मार्क्सवादी कम्युनिस्ट या पक्षांनी बालकविषयक एकही प्रश्न विचारला नाही.
 
 

महिलांबाबत सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या दीपिका चव्हाण आघाडीवर
महिलाविषयक सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या आमदारात बागलाणच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार दीपिका चव्हाण या प्रथम क्रमांकावर आहेत. अधिवेशनांतील उपस्थितीची सरासरी शंभर टक्के असलेल्या त्या एकमेव आमदार आहेत. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंग भोसले हे सर्वात कमी म्हणजे ३७ टक्केच उपस्थित राहिले आहेत. दरम्यान, शेकापच्या तीन आमदारांनी १७२ प्रश्न विचारले आहेत. रासप व सप यांच्या एकेका आमदाराने प्रत्येकी ५१ आणि ४९ प्रश्न उपस्थित केले आहेत.
 
 

प्राधान्याने विचारले हे प्रश्न
रिक्त पदे, प्रलंबित प्रकल्प, घोटाळे, शासकीय रुग्णालयांत सिटीस्कॅन मशीन-ट्रॉमा सेंटरची निकड, अवैध वाळू उपसा, अनधिकृत बांधकामे, एमआयडीसीतील प्रदूषण, पुनर्विकासातील गैरव्यवहार, गुंतवणूकदारांची फसवणूक, जिल्हा बँकांतील घोटाळे, नद्यांचे प्रदूषण यावर वारंवार प्रश्न उपस्थित केलेत.

आमदारांना शिकवणी
अल्प मानवविकास निर्देशांक असलेल्या जिल्ह्यांतून अधिकाधिक प्रश्न विधानसभेत उपस्थित व्हावेत, यासाठी ७ मतदारसंघांत ‘संपर्क’ने स्थानिक नागरिकांचे ‘आमदार संवाद मंच’ कार्यरत केले आहेत. नागरिक व लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय घडवून आणला जात आहे. अशी माहिती संपर्कचे हेमंत कर्णिक (मुंबई) यांनी दिली. 
 

पाण्यावर सर्वाधिक, सर्वात कमी महिलांवर

9835 प्रश्नांमध्ये ‘मुंबई' शब्द 1,067 वेळा आला आहे

731 वेळा म्हणजेच सर्वाधिक प्रश्न पाण्यावर विचारले

73 प्रश्न महिलांवर विचारले गेले. एकूण विषयात ही सर्वात कमी प्रश्नसंख्या

​​​​​​​शिक्षणावर ६२०, आरोग्य ५६७, शेतीवर ५६६, बालक ३३८, बेरोजगारी ९७ आदी महत्त्वाच्या विषयांबद्दल आमदारांकडून प्रश्न विचारले गेले
 

9835 एकूण प्रश्न विचारले (२०१४ ते १८ या काळातील सर्व १३ अधिवेशनांशी आकडेवारी)
2,957 भाजप
2,549 काँग्रेस
2,436 शिवसेना
1,330 राष्ट्रवादी 
 
 

बातम्या आणखी आहेत...