आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला, रमजानमध्ये दुध 190 रुपये, सफरचंद 400 रुपये तर मटण 1100 रुपये किलो विकल्या जात आहे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची(पाकिस्तान)- वाढत्या महागाईचा पाकिस्तानला चांगलाच फटका बसला आहे. इमरान सरकार महागाई आणि रूपयांची घसरण थांबवण्यात अपयशी ठरल्यामुळे नागरिकांना खूप अडचनींचा सामना करावा लागत आहे. वाढत्या महागाईचा परिणाम एवढा झाला आहे की, पाकिस्तानात दुध 190 रुपये लीटरने विक्री होत असून सफरचंद 400 रुपये किलो, संतरी 360 रुपये, केळी 150 रुपये डझन, आणि मटन 1100 रूपये किलो या दराने विक्री होत आहे. 


रमजानमुळे वाढली महागाई 
रमजान महिन्यात खाण्या-पिण्याच्या गोष्टींची अधिक मागणी असल्यामुळे लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मार्च ऐवजी मे महिन्यात कांदा 40%, टमाटे 19% आणि मुगाची दाळ 13% जास्त दराने विकल्या गेली. तसेच गुळ, साखर, शेंगदाने, माशे, मसाले, तुप, तांदूळ, पीठ, तेल, चाहापत्ती, गव्हाचे दर 10 टक्क्यापर्यंत वाढले. यामुळे लोक सोशल मीडियावर सरकारच्या धोरणाचा जोरदार विरोध करत आहेत. बाजारावर रिसर्च करणाऱ्या एका स्थानिक संस्थेनुसार, ऑटो, सीमेंट आणि औषधी यासारख्या कच्चा मालाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.  

 

व्यापारी वर्ग निराश 
या परिस्थितीमुळे व्यापाऱ्यांचा बाजारावर विश्वास राहिला नाही. चलन तज्ञांच्या मते, पाकिस्तानी चलनाच्या घसरणीचे सर्वात मोठे कारण म्हणजे, आयएमएफने 6 अरब डॉलर पॅकेजच्या करारावर सहमती दर्शवली त्यामुळे पाकिस्तान आर्थिक संकटात सापडला. जो करार सरकारने केला आहे, तो लोकांसमोर आणून पुर्ण वर्षांची घसरण एकाच वेळेस केली पाहिजे. आम्ही जेव्हापासून अमेरिकेसोबत चर्चा सुरू केली आहे, तेव्हापासून डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रूपयामध्ये सातत्याने घसरण होत आहे. पाकिस्तानमध्ये मागील 17 वर्षात शेअर बाजाराची ही सर्वात मोठी घसरण आहे. येथील व्यापाऱ्यांनी सरकारकडे मार्केट सपोर्ट फंड तयार करण्याची मागणी केली आहे. तसेच, केंद्रिय बँक सोमवारी आपले चलन विषयक धोरण जाहिर करणार आहे. 
 
 

पाकिस्तानी रूपयामध्ये मे महिन्यात 29 टक्के घसरण  
मे महिन्यात पाकिस्तानच्या चलनात 29 टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे हे चलन आशियातील 13 प्रमुख चलनापैंकी सर्वात कमजोर चलन ठरले आहे. यादरम्यान एक डॉलरचे मुल्य जवळपास 150 पाकिस्तानी रुपये झाले आहे. तर 70 भारतीय रूपये एक डॉलरच्या बरोबरीचे आहेत. डॉलरच्या तुलनेत नेपाळी रु 112, बांग्लादेशी टका 84 आणि अफगानी (अफगानिस्तानी मुद्रा) 79 आहेत.

बातम्या आणखी आहेत...