आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हँड्सअप ! दाेन्ही हात वर करा, असे सांगत पाेलिसांची बंदुकीच्या धाकावर तपासणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बदायू - उत्तर प्रदेशमधील बदायू जिल्ह्यातल्या बागरेन भागात  पाेलिस   बंदुकीच्या धाकावर दुचाकीस्वारांची तपासणी करत असल्याचा व्हिडिआे समाेर आला आहे. ज्यामध्ये पाेलिस हँड्सअप, दाेन्ही हात वर करा, हलू नका, असे सांगत असल्याचे एेेकायला येते. तपासणी करणारे पाेलिस अधिकारी बागरेन पाेलिस चाैकीचे प्रमुख राहुल शिसाेदिया आहेत. 


शिसाेदिया म्हणाले, अधिकाऱ्यांना काेणत्याही संशयिताची तपासणी करताना सतर्कता बाळगण्याचे आदेश दिले हाेते. त्यामुळे संशयितांची बंदुकीच्या धाकावर तपासणी केली. पाेलिस अधिकारी अशाेक कुमार त्रिपाठी म्हणाले, बंदुकीच्या धाकावर तपासणी हा पाेलिस प्रशिक्षणाचा भाग आहे. त्यामध्ये काही चुकीचे नाही.