आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 दिवसात 'बधाई हो' चित्रपटाने मोडला सुपरस्टार चित्रपटांचा रेकॉर्ड, आलिया आणि राजकुमार रावच्या चित्रपटाला 7 दिवसात पछाडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. आयुष्मान खुराना आणि सान्या मल्होत्रा स्टारर मूव्ही 'बधाई हो' बॉक्सऑफिसवर रोज नवनवीन रेकॉर्ड बनवत आहे. फर्स्ट वीकेंड 2018 च्या टॉप-15 चित्रपटांमध्ये समावेश झाल्यानंतर या चित्रपटाने आता अक्षय कुमार आणि अजय देवगणच्या चित्रपटांचा रेकॉर्डही मोडला आहे. ट्रेड एनालिस्ट तरण आदर्श यांच्या ट्वीटनुसार, चित्रपटाने रिलीजच्या 9 व्या दिवशी 3.40 कोटींची कमाई केली आहे. तर आतापर्यंत चित्रपट 69.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. 


2018 मधील 7 वा सर्वात मोठा फर्स्ट वीक ग्रॉसर बनला 
फर्स्ट वीक कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर अमित शर्माच्या डायरेक्शनमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने अक्षय कुमारचा पॅडमॅन (63.05 कोटी) आणि अजय देवगणच्या रेड(63 कोटी) च्या कलेक्शनला मागे टाकले आहे. हा चित्रपट आयुष्मानच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट बनला आहे. यापुर्वी त्याच्या कोणत्याही चित्रपटाने एवढी कमाई केलेली नाही. बॉलिवूड ट्रेड एनालिस्ट्सनुसार, 'बधाई हो'100 कोटींच्या क्लिबमध्ये सामिल होऊ शकतो. 

 

पहिलेच मोडला 'स्त्री' आणि 'राजी'चा रेकॉर्ड
20 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या 'बधाई हो' चित्रपटाने रिलीजच्या सहाव्या दिवशीच 56.85 कोटींची कमाई केली. यावेळी चित्रपटाने दोन कमी बजेटचे चित्रपट 'राजी' आणि 'स्त्री'चा रेकॉर्ड मोडला होता. आलिया भटच्या 'राजी' चित्रपटाने एका आठवड्यात 56 कोटींची कमाई केली होती. तर राजकुमार रावच्या 'स्त्री' चित्रपटाने 59 कोटींची कमाई केली होती. याच्या तुलनेत 'बधाई हो' चित्रपटाने 61 कोटींची कमाई केली होती. 


2018 च्या 10 सर्वात मोठ्या फर्स्ट वीक ग्रॉसर्स 

 

फिल्म फर्स्ट वीक कमाई
संजू 202.51 कोटी 
पद्मावत 166.50 कोटी 
रेस 3 145 कोटी 
बागी 2 112.85 कोटी 
गोल्ड 88.90 कोटी 
सत्यमेव जयते 73.50 कोटी 
बधाई हो 66.10 कोटी 
पैडमैन 63.05 कोटी 
रेड 63 कोटी 
सुई धागा 62.50 कोटी 

 

 

बातम्या आणखी आहेत...