आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Badhaai Ho Were Made With Seriousness, That's Why The National Award Is Being Received: Amit Sharma

'गांभीर्याने बनवला होता 'बधाई हो', त्यामुळे मिळाला राष्ट्रीय पुरस्कार' : अमित शर्मा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमित कर्ण : 66 व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये बॉलिवूड चित्रपटांची चलती आहे. 'उरी', 'अंधाधून' आणि 'बधाई हो' आदी मुख्य प्रवाहातील चित्रपटांनी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार जिंकले आहेत. 'बधाई हो'ला दोन श्रेणीत पुरस्कार मिळाले आहेत. उत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटासाठी आणि अभिनेत्री सुरेखा सीकरीला उत्कृष्ट सहायक कलाकारासाठी पुरस्कार मिळणार आहे. तत्पूर्वी दिव्य मराठीने चित्रपटाचे दिग्दर्शक अमित शर्मा यांच्याशी खास चर्चा केली. 

'ईश्वराच्या कृपेने वर्षाचा शेवट आणि नवीन वर्षाचे स्वागत चांगल्या पद्धतीने होत आहे. राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला मी पहिल्यांदाच उपस्थित राहणार आहे. सोहळ्याबाबत जी काही माहिती मिळत आहे, त्यामुळे अधिकच उत्सुकता वाढत चालली आहे. मात्र, हातामध्ये पुरस्कार मिळेल तेव्हा आनंदाला पारावार राहणार नाही. पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी आणि चित्रपटाच्या दोन्ही निर्मात्या येत आहोत. माझ्या वडिलांनाही सोबत घेऊन जाणार आहे. मुलाचा सन्मान होताना बघितल्यास खूप गर्व वाटेल, असे ते म्हणाले होते.'


विशेष म्हणजे हा चित्रपट समीक्षा आणि व्यावसायिकता या दोन्ही बाबीत यशस्वी ठरला आहे. आता राष्ट्रीय पुरस्कारही मिळवत आहे. चित्रपटाचा विषय सर्वांना आवडेल असाच होता. हा कौटुंबिक चित्रपट असल्याने कुटुंबांनी तो जास्त बघितला. त्यामुळे व्यावसायिकदृष्ट्याही तो यशस्वी ठरला. याची स्क्रिप्ट फार विचार करून लिहिली गेली आणि निर्मितीदेखील गांभीर्यपूर्वक करण्यात आली. त्यामुळेच आज याची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. या वर्षी ऑगस्टमध्ये याची घोषणा झाली होती तेव्हा मी भावुक झालो होतो. अशा प्रकारे कौतुक व्हायलाही भाग्य लागते. वारंवार हा पुरस्कार मिळत राहावा, असे वाटते. यापूर्वी 'तेवर'ची निर्मिती केली होती. तोदेखील व्यावसायिक चित्रपट होता, परंतु चालला नाही. त्यामुळे तुम्ही कितीही व्यावसायिक चित्रपट बनवा, पण त्याची कथा चांगली नसेल तर लोक ती पसंत करत नाहीत, हेच यावरून कळाले. कल्पना मोठी असली पाहिजे.


आपल्याला कोणता चित्रपट बघायचा अन् कोणता नाही, हे जनतेने दाखवून दिले आहे. ट्रेलर रिलीज झाल्यानंतरच प्रेक्षकांचा चित्रपटाबाबतचा कल समजून आला. राष्ट्रीय पुरस्काराबाबत माझे फर्स्ट इंप्रेशन खूपच सकारात्मक राहिले आहे. खरे म्हणजे मी पुरस्कारांसाठी हपापलो आहे. आपल्या अॅडवरटायझिंग करिअरमध्येही मला खूप पुरस्कार मिळाले आहेत. माझ्या मते, नावासोबतच पुरस्कार मिळणेदेखील आवश्यक आहेत. त्या पुरस्कारांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार तर सर्वात मोठा आहे.

बातम्या आणखी आहेत...